Skip to main content

अस्तु

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 12/02/2014 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकठनकर हे अवलिया दिग्दर्शक आहे हे तसं 'वास्तुपुरुष' पाहिल्यावरच लक्षात आलं होतं.... मग संहिता पाहिला आणि मत अगदी ठाम झालं .... आणि नुकताच "अस्तु"चा हा ट्रेलर पाहण्यात आला http://www.youtube.com/watch?v=NY3cNmtFmaA (इथे व्हिडीयो दिसेल अशा प्रकारे लिन्क कधी देतात ?) काय मस्त ट्रेलर आहे ....

'वचने,प्रतिज्ञा, डार्विन आणि आपण '

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 12/02/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
'वचने, शपथा, डार्विन आणि आपण' संपुर्ण मानवजमातीत वचन या प्रकाराला प्रचंड महत्व आहे. आपण स्वत: आजवर एकाही वाईल्ड किंवा डोमेस्टिक अॅनीमलला दुसर्या तत्सम प्राण्यास वचन देताना पाहिले नाही.यावरुन हेच सिद्ध होते की प्राणिजातीत वचन देणे घेणे ही प्रथा अजुन सुरु झालेली नाही. कदाचित त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पुरेशा असतात. मनुष्य हा मुळातच स्खलनशील असतो, त्यामुळे त्याने स्वत:च्या स्खलनशील प्रव्रुत्तीस आळा घालण्यासाठी वचन हा प्रकार शोधून काढला! कालांतराने वचन देण्याचे तोटे लक्षात आल्यावर ते बळजबरीने घेण्याकडे कल निर्माण झाला.

काही दिवसांनी "अरे चूप कर, आब रूलायेगा क्या?" असे म्हणायची वेळ येईल असे वाटते.

लेखक विदेशी वचाळ यांनी बुधवार, 12/02/2014 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
आप ने केन्द्र सरकारवरच निशाना साधला हे काय वाचतो आहे मी. आप ने फ आई आर दाखल करून त्यात दोन केंद्रीय मंत्री आणी अंबानी साहेबांना गुंतावले आहे? काल पार्यंत आप च्या चळ्यांना माकड चाळे म्हणून मजेत पाहत होतो. आता वाटत आहे की माकडाच्या हातात कोलित दिले की काय? जवू देत म्हणा. अती झाले आणी हसू आले. पण व्यवस्था नीट लावायला निघालेली ही माणसे स्वताहा अगदीच अव्यवस्थित आहेत असे वाटते. निर्णया घेण्याचा घटनाडत्त अधिकार ज्या पदास आहे, त्या पदावरच्या व्यक्तीस असे कोर्टात खेचता येते का? आता आधीच गजबजलेल्या कोर्टात आणखीन केस येतील. मग मी तुला, तू त्याला आणी तो मला असे करत साखळी केस तयार होतील.

पुन्हा टोलचा घोळ!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 11/02/2014 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरे पुण्यात गरजले ते निव्वळ टोलचा मुद्दा घेऊनच. त्या सभेचे कवित्व सभेच्या जागेपासून सुरु झाले होते. कुण्या वरिष्ठ राष्ट्रवादी नेत्याच्या मध्यस्थीमुळे सपचे पटांगण सभेला मिळाले अशी कुजबूज होती. सरकारी टाळक्यात नारळ हाणण्याची रांगडी भाषा केली गेली तरी शिवसेनेला असेच वाटते आहे की सरकारने फूस देऊन मनसेला हे खोटे अवसान आणायला सांगितले आहे. ह्यात काही अर्थ नाही असे शिवसेनेला वाटते. http://saamana.com/2014/February/11/agralekh.htm दुसरीकडे मनसेने मोठी आश्वासने देऊन काहीही केलेले नाही (विकासाची ब्लू प्रिंट वगैरे).

Autism - लक्षणे व Evaluation

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 11/02/2014 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे लेख : पहिला लेख : Autism.. स्वमग्नता.. दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/02/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :) तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्‍या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले.

नवीन चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 11/02/2014 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
राख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला.
काव्यरस

मन रे

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 11/02/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात
काव्यरस

गणेशा मोड

लेखक राजो यांनी मंगळवार, 11/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव चा सभासद झाल्यापासून (वाचनमात्र असताना सुध्दा) अनेक लेखांच्या प्रतिसादांमधे "माझा गणेशा झालाय" आणि अशाच प्रकारचे कोड्यात पाडणार्‍या कमेंट्स असायच्या.. नंतर लक्षात आले कि गणेशा या आयडी ला लेखांमधील चित्रे दिसत नसत, त्यामुळे हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे.

"यू अ‍ॅटीट्यूड" संकल्पनेकरीता मराठी शब्द हवा

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/02/2014 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे. सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.