Skip to main content

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/02/2023 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
✪ प्रखरता नव्हे शीतलता ✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी ✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर ✪ "छांदसी आणि सुमित्रा" ✪ पतझड़ है कुछ, है ना? ✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो? ✪ मै अहम हूँ यही वहम था सर्वांना नमस्कार. मनामध्ये आलेल्या अनेक भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्या... आणि त्याबरोबरच मामा, काका अशा जागा अतिशय जिव्हाळ्याच्या असतात. सतत जवळ असल्यामुळे आणि उग्र अशा प्रखरतेमुळे आई- बाबा ही नाती काहीशी दुरावलेली असतात. किंवा निकटता आणि प्रखरता असल्यामुळे डोळ्यांवर काहीशी अंधारी आलेली असते. सतत समोर असलेली गोष्ट आपले डोळे हळु हळु बघणं कमी करतात.

बुलेटप्रूफ कॉफी

लेखक सुनील यांनी बुधवार, 15/02/2023 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. मा‍झ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्‍या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तसे पाहीले तर इंटरनेटवर अक्षरश: हजारो उपाय उपलब्ध आहेत. परंतु मला सोपा, खात्रीशीर, स्वस्त आणि सर्वात मुख्य म्हणजे लॉजिकली पटणारा असा उपाय हवा होता.

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ८:डलहौसी ते खज्जियार प्रवास आणि वाटेतील पर्यटनस्थळे

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 14/02/2023 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ येथे वाचा आज डलहौसीहून मुक्काम हलवून खज्जियारला जायचे होते. आतापर्यंचा गीतांजली हॉटेलचा अनुभव खुपच चांगला होता. येथील खोल्या, अतिथ्यशील कर्मचारी, जेवण सर्वच चांगले. नाश्ता वगैरे आटोपून बिल भरण्यासाठी काउंटरला पोहचलो. हिमाचल प्रदेश पर्यटन मंडळाच्या हॉटेलचे ऑनलाईन बुकिंगची सोय आहे व तिचा फायदा आम्ही घेतला होता. बुकिंग करतांना एकाच वेळी अनेक खोल्यांचे एकत्र बुकिंग करता येते. ऐनवेळी आमच्या सहलीतील काही जण कमी झाल्याने आठ दिवस आधी आम्ही दोन खोल्या रद्द करण्याचे ठरविले.

प्रेम दिन : मिठी : काही क्षण कथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 14/02/2023 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला. त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली. त्याच्या मिठीत ती सुखावली. ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली. मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला. आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली.

आठवणी रेंगाळतात.

लेखक भागो यांनी मंगळवार, 14/02/2023 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
“काय झाल? विकला गेलास की नाही?” “नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,” “हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.” “मला भीति वाटतीय”. “भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.” “मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.” “कोण म्हणालं?’ “तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून.

साद

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/02/2023 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून येते हे धुके अन् वेढते भवताल सारे फिकटल्या चंद्रासवे मग हरवती अवघेच तारे कोन ढळती दशदिशांचे वाट बिनचुक सांगणारे अन् तमाच्या खोल डोही वितळती दिग्बंध सारे गडद ह्या छायेतळी जरी उमगती गूढार्थ न्यारे मर्म कोड्यांचे कळे परी प्रश्न उरती टोचणारे या धुक्याच्या पार वाहे कोणती सरिता बरे? त्या प्रवाही वाहताना साद घाली कोण रे?

एक धुंद गुलाबी सकाळ -२!

लेखक Bhakti यांनी रविवार, 12/02/2023 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मायंबा दरा अर्जुनाने देवास पुसले, हा योग कैसा? योगसाधनेसाठी उत्तम ,निरापद स्थान‌ शोधणे आवश्यक आहे. ते कैसे असावे? तर जेथ वैराग्य दुणावेल.जे संतांनी वसविलेले असेल .जेथे परब्रह्माचा साक्षात्कार अगदी सहज घडू शकेल.जेथ साधक राहत असेल.जे दूर,एकान्तामध्ये असेल.मंद छाया,मंद प्रकाश आणि मंद पवनाचे झोंके......त्या ठिकाणी एकान्ती आसन लावावे. गो.नी.दा.

Thrills on Wheels दुसरा टप्पा

लेखक मालविका यांनी रविवार, 12/02/2023 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on wheels ( Thane - Statue of Unity - Thane) दुसरा टप्पा सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन सायकल खाली घेवून आलो नि बॅग सायकलला जोडल्या. माझी मैत्रीण कांचनचा नवरा सूरज सायकलिस्ट आहे. तो आम्हाला ठाण्याहून अहमदाबाद हाय वे पर्यंत सोबत करणार होता. बरोबर ६ वाजता तो हजर झाला.ठाण्याचे एक एक रस्ते पार करत घोडबंदरच्या चढाला लागलो. सुदैवाने अजिबात ट्रॅफिक नसल्याने आणि सकाळच्या फ्रेश मूड मध्ये चढ चढून उतार एकदम मस्त उतरलो. काशिमीरा जंक्शन ला उजवीकडे वळून अहमदाबाद हाय वे ला लागलो. साधारण ३० किमी झाले होते. एके ठिकाणी चहा प्यायला आणि फोटो काढून सूरज आम्हाला बाय करून पाठी फिरला.

प्रपोज डे: लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/02/2023 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
सदू, घरी येणार होतास ना! "जमणार नाही काका". का बरे? "काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले." वा! छान, पुढे काय ... "तिच्या सोबत डॉगी होता." (त्याने फोन ठेवला)