Skip to main content

रंग आणखी मळतो आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 22/03/2014 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१)

लेखक आतिवास यांनी शनिवार, 22/03/2014 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुभव १ ‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो. एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा! तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता.

अशीच एक फँटसी..(१)

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 21/03/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या. ..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.

ट-२० विश्वचषक स्पर्धा

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 21/03/2014 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे. ३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.

गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 21/03/2014 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्‍या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे. मराठी विकिपीडियावर मागच्या वर्षाभरात (२०१३) जे काही लेखन मी केल त्यात गीतरामायण लेखाच ज्ञानकोशीय लेखन करण्यात समाधान मिळालं.

सत्ययुग कधी येणार...?

लेखक संतोषएकांडे यांनी शुक्रवार, 21/03/2014 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार. आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...! नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे.

ही अता विद्रोह करते कातडी

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 21/03/2014 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी पाय मातीचेच सार्यांचे इथे चाल उंटाचीच होती वाकडी पोट छोटे भूक मोठी फार ही ही पहा कुरकूर करते आतडी थोर समतेचा तुझा दावा खरा मारती ही हात आता मापडी तू जरी आजन्म करशी भिक्षुकी रे तुझी झोळीच राहे तोकडी छान तू हा न्याय सार्यांना दिला वाजतो हा दंड नुसता लाकडी जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले ही अता विद्रोह करते कातडी पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा थरथरु दे ही जीवाची पालडी वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी डॉ.सुनील अहिरराव

तिकीट

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 21/03/2014 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची.. आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते.. आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची. राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे.. त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची.. हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे..

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 21/03/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे . चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत .

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 21/03/2014 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
नील बिडलमन ११ मे च्या संध्याकाळीच आपल्या तुकडीतील सदस्यांसह साऊथ कोल उतरुन कँप ३ वर पोहोचला होता. सुमारे २५००० फूट उंचीवर पोहोचल्यावर त्याने सँडी हिलला डेक्सामेथासनचं आणखीन एक इंजेक्शन दिलं. ल्होत्से धारेच्या खालच्या उतारांवर ते पोहोचत असताना त्यांच्या मदतीला येत असलेल्या बेपाळी मोहीमेतील शेर्पांशी त्यांची गाठ पडली. त्या शेर्पाच्या सहाय्याने ते खाली उतरत असतानाच अनपेक्षीतपणे संत्र्याच्या आकाराच्या दगडांचा एक लोंढाच ल्होत्से धारेच्या वरच्या उतारांवरून गडगडत आला ! त्यातील एक दगड नेमका एका शेर्पाच्या डोक्यावर येऊन आदळला ! त्या आघातामुळे तो शेर्पा तत्काळ बेशुध्द झाला आणि उतारावर घसरू लागला !