आज कुछ तुफानी करते है…
-------------------------------------------------
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं .
परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.
तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय
तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत.
१. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत.
२. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत.
३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही.
४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि
५.
व्यवहारज्ञान (२)
मि. ऱ्होडस ची नाराजी बहुदा मि. पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते,
"असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा मि. ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे की कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या केसेस चे तज्ञ समजले जातात.
संतूर आणि पं. शिवकुमार शर्मा - एक अनोखी स्वरयात्रा
संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते.
प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स
एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.
बघ जरा बघ जरा,
जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये,
खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये !
रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये
श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये !
फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ?
भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ?
मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ?
नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान
बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे,
बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !
रवा डोसा पण वेगळा !
मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय.
साहित्य: १. एक वाटी बारीक रवा
२. एक वाटी मैदा (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल)
३. २-३ कांदे किसून
४. ताक
५. मीठ , साखर चवीनुसार
फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून
कृती :
१.
एका कादंबरीची कथा
स्थळ :सारस्वत कॉलनी सांताक्रुझ
ठाकूर सर सकाळची प्रभातफेरी आटपून घरी आले.एरवी चहा वाट बघत असायचा पण आज घराचा मूड काही बरा वाटत नव्हता.
त्यांनी शोधक नजरेनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण टिपॉयवर साठलेली एक नोटबुकांची चळत सोडता काही नजरेस येईना.
ही बुकं कुठून आली बॉ असा विचार मनात आला पण घराच्या मूडाचा अंदाज घेण्याच्या विचारात ते राह्यलंच.
मॅडम ते यायच्या अगोदरच बाहेर पडल्या होत्या.
एरवी ते फोन फारसा वापरत नाहीत पण
त्यांनी मॅडमना फोन लावलाच.
" कुठ्येस ?"
"माहीमला पोचत्येय"
"आज घाईत होतीस का ?"
"नाय हो पळाले घरातून आज "
ठाकूरांना काही कळेना .
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का?
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......
(आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.)
(पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल.
पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....
मिसळपाव