Skip to main content

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

बागलाण भटकंती - भाग २

लेखक सह्यमित्र यांनी मंगळवार, 06/05/2014 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
बागलाण भटकंती - भाग १ साल्हेर वाडी मध्ये एका टपरी वजा दुकानात चहा मारला आणि त्याच्याच दारात गाडी लावली. साल्हेरवर गुहेत मुक्काम करायचा असल्याने त्या दृष्टीने लागणारी सामुग्री बरोबर घेतली आणि वाटेला लगलो. साल्हेरच्या बाजूला आल्यावर एक गोष्ट जाणविली ती म्हणजे वातावरणातील बदल. मुल्हेर च्या इथले दमट, वारा नसलेले दमाविणारे हवामान इथे नव्ह्ते. मस्त गार वारा वाहत होता. उन्हाचा कडाकाही विशेष नव्हता. गावातून साल्हेर चा सर्वोच्च माथा ढगात लपल्या मुळे दिसत नव्ह्ता. परत एकदा अनुप च्या मार्गदर्शन खाली वाटचाल सुरु केली.

पुष्पराज

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 06/05/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिभुवन सुंदर पुष्पराज पर्णावर होते विराजले जणू माझ्या स्वागतासाठी आतुरलेले मिटलेल्या नयनांनी हसणारे सुगंध कुशीत ठेवणारे सायंकाळी सुंदरतेचा मुखवटा उतरला पुष्पराज सुगंधातुन दरवळत राहिला सुंदरतेचे अस्तित्वही नामशेष जाहले गुणरुपी सुगंधच स्मरणात राहिले

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/05/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे.

भुरका / तिखटी

लेखक मितान यांनी मंगळवार, 06/05/2014 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठेचा खर्डा यांच्या नातेवाईकांमधला अजून एक पदार्थ .... आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात. हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात.

९० डिग्री साऊथ - ५

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 06/05/2014 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ४. दक्षिण धृवाच्या दिशेने मोहीमेची तयारी चालू असताना अ‍ॅमंडसेनला एका गोष्टीची सतत काळजी वाटत होती. स्कॉटजवळ असलेल्या मोटरस्लेज ! जानेवारीच्या महिन्यात कँपबेलशी झालेल्या भेटीतून आणि चर्चेतून मोटरस्लेज उत्तम काम करत असल्याचं अ‍ॅमंडसेनला समजलं होतं. मोटरस्लेजने प्रवास करण्याचा स्कॉटच्या मोहीमेला फायदा होईल याचा त्याला अंदाज आला होता. त्यामुळे ऑगस्ट अखेरीस सूर्योदय होताच फ्रामहेममधून दक्षिण धृवाच्या दिशेने निघण्याचा त्याने निर्धार केला होता. अ‍ॅमंडसनच्या या बेताला योहान्सनने स्पष्टपणे विरोध केला.

मिठीत तुझ्या असताना...

लेखक जेनी... यांनी सोमवार, 05/05/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत तुझ्या असताना... ओठातल्या ओठात हसताना.. पापण्यांची होते फडफड श्वास श्वासांवर झेलताना... धुंद मी..बेधुंद तु असताना.. रती मी..मदन तु होताना... शहारतो श्वास माझा...

पराचा पारवा होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 05/05/2014 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
किती हे शांत होते गाव ,जेव्हा मी नवा होतो अता भेटीस मी आलो तुझ्या की गवगवा होतो किती गावे इथे सूरात मी, पण दाद ना मिळते किती केलास तू कल्ला तरीही वाहवा होतो इशार्यावर इशारे ते कुणाचे सांगना होते जरा मी हात धरला तर पराचा पारवा होतो तुझ्यामाझ्यातला हा वाद आता सोडवावा तू - जरा मी बोललो हलके तरीही वाढवा होतो अता कळते, कशासाठी मला तू टाळले तेव्हा .. तुला मी नेहमीसाठी तुझ्याजवळी हवा होतो डॉ.सुनील अहिरराव

मुंबई - पुणे - मुंबई

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी सोमवार, 05/05/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही.