हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग ३
मित्रांनो
हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से
भाग 2 वाचलात.
आता पुढील भाग ३ वाचा.
इतके वर्षांनी हा धागावर यायला सध्या मी हवाईदलातील दिवसांवर वेबसाईसाठी लिहायला सुरू केले आहे हे ही कारण आहे म्हणून...
साहसी छायाचा जीवघेणा प्रवास
मी नुकताच कानपूरहून पोस्टींगवर चंदीगढला आलो होतो. आधी चंदीगडला पोस्टींग झाले असल्याने शहर, वायुस्टेशन मला नवीन नव्हते. माझा मध्यंतरी विवाह होऊन एक वर्ष पुर्ण झाले होते. घर मिळे पर्यंत मी मेस मधे राहात होतो व क्वार्टर मिळायला अवकाश होणार होता. म्हणून ती तिच्या घरी मुंबईला गेली.
मिसळपाव