Skip to main content

सेव्हन कप केक

लेखक लव उ यांनी गुरुवार, 12/06/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.

अस्थी कृषीवलांच्या

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 12/06/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

भटकंती कर्नाटकातली

लेखक कंजूस यांनी बुधवार, 11/06/2014 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत.

हिंदु अस्मितेचा उदय

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 10/06/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram… आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे .

दुखरी नस...!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 10/06/2014 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही...

दाखला

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 10/06/2014 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)

पडद्या मागची व्यथा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/06/2014 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंगविले मुखवटे अनेक स्वत:चा चेहरा मात्र रंगविला न कधी. तालावर नाचविल्या मंचावर कठपुतळ्या नाचायला मला मिळालच नाही. मान नटसम्राटाचा मिळतो बाहुल्यांना दंश पराजयाचा मलाच का मिळावा. पडद्या मागची व्यथा कळेल का कुणाला रंगमंचावर मिळेल का कधी मान सूत्रधाराला.
काव्यरस

पर्यावरणाची ऐशी तैशी!

लेखक मीराताई यांनी सोमवार, 09/06/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.