Skip to main content

’मी...ग़ालिब' ला भेटताना...

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 22/07/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब! आपण अस्सल तुर्की वंशाचे आहोत असा अहंकारमिश्रित समज असलेला, नबाबाच्या घराण्यात जन्मलेला आणि त्यामुळेच जगण्यासाठी कमवावे लागते याची गंधवार्ता नसलेला.

कोणी आहे का इच्छुक

लेखक कबीरा यांनी मंगळवार, 22/07/2014 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
९-१० ऑगस्ट ला कोयना नगर ला दुचाकी वर रपेट मारून यावी अशी इच्छा आहे. कोयना नगर ला पावसाळ्यात सुंदरच वातावरण असेल. कोणी मिपाकर आहे का इच्छुक ? डिट्टेलवारी अजून काहीच नाही. जसे मावळे जमतील तस ठरवूया.

अभिजात भाषा सप्ताह कधी ?

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 22/07/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे.

आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 22/07/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का?

टि टाईम स्नॅक्स प्रकार ३ - राजस्थानी तिक्कर

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 22/07/2014 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
Tikkar1 साहित्यः १. मक्याचं पीठ - १ बाउल २. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल ३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या) ४. साजुक तुप - २ मोठे चमचे ५. गव्हाचं पीठ - १ बाउल ६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर ७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल ८. चवीनुसार मीठ ९.

संत ज्ञानेश्वर व आपण

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 22/07/2014 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.

बाउन्सर्स आणि यॉर्कर्स

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 22/07/2014 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा. पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात.

...........काय बोलू.........

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/07/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते.

भुलेश्वर भ्रमंती: शनिवार २६ जुलै २०१४ रद्द

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 21/07/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
a भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर. भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत.