Skip to main content

थोडे अद्भुत थोडे गूढ - १

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 25/08/2014 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्‍या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्‍या वार्‍याचा देव म्हणून ओळखला जात होता! आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली.

क्रिम पफ Swans

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 24/08/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य Choux पेस्ट्रीसाठी: १/२ वाटी मैदा १/२ वाटी पाणी १/४ वाटी अनसॉल्टेड बटर २ अंडी १/४ टीस्पून मीठ १/२ टीस्पून साखर (ऑपश्नल) . पाकृ: एका नॉन-स्टीक पॅनमध्ये पाणी.

कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)

लेखक शरद यांनी रविवार, 24/08/2014 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर) संत साहित्याशी आवड तशी जरा लवकरच लागली म्हणावयास हरकत नाही. कॉलेजात असतांना एक मित्र गुणगुणत होता "उड उड रे काऊ. तुझे सोन्याने मढवीन पाऊ " मी खुश होऊन विचारले ’कोण कवी रे ?" तो म्हणाला "ज्ञानेश्वर" मी म्ह्टले " काय थापा मारतोस ! संत असे कधी लिहितील काय ?" तो म्हणाला, "खरेच ". मी लायब्ररीत जाऊन कविता (हो, कविताच, अभंग नाही ) शोधून काढली व असा प्रथम वाचनातच प्रेमात पडलो. तो पर्यंत वसंत बापट. मंगेश व विंदा, बोरकर यांच्याबरोबर म.वा. धोंड (मराथी लावंणी) हेच आमच्या वाचनात व पाठांतरात होते.

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 24/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट मार्गे - एक दिवसीय ट्रेक

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 24/08/2014 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट भीमाशंकर हा असा ट्रेक आहे कि यात दुर्गा डूंच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धबधबा,चढाई , Rock patch,ladder, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य,धुके काय लिहू नि काय नको इतक्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात नि श्रावण मास सुरु होण्याअगोदर भीमाशंकर ट्रेक तो बनता है boss !!!!!!!!!! भीमाशंकर हे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक ! तसेच भीमाशंकर हे सर्वात लहान अभयारण्य आहे जेमतेम १०० वर्ग किमी. येथे राज्य प्राणी शेकरू हा आढळतो, परंतु ज्याचे दर्शन फार दुर्लभ आहे. आता पर्यंतच्या दोन वारीत शेवटच्या वारीत mala केवळ शेपूट पाहून समाधान मानावे लागले.

दहीहंडी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 24/08/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.

लेखक दिवाळी अंक यांनी रविवार, 24/08/2014 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. :) मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती.

अनंतमूर्ती अनंतात विलीन!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 24/08/2014 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध कन्नड साहित्यिक अनंतमूर्ती ही नुकतेच मरण पावले. निवडणुकीपूर्वी मोदींना असणारा तीव्र विरोध दर्शविण्याकरता त्यांनी असे वादग्रस्त विधान केले की मोदी पंतप्रधान बनले तर मी हा देश सोडून जाईन. (आता उशीराने का होईना बोले तैसा चाले असे त्यांनी करून दाखवले आहे. नुसता देशच नाही तर जगच सोडून त्यांनी आपले वचन पाळले हा भाग वेगळा) पण त्यांच्या त्या विधानाचे व त्या विधानाने उठलेल्या गदारोळाचे कवित्व अद्याप बाकी आहेच.

अवशेची कविता बिविता....

लेखक फुंटी यांनी रविवार, 24/08/2014 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना.... सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना .. मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ... कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ... अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात... शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट.... मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत .... काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे.... कोण कुठले अनामिक आहोत आपण.... एका अद्वैताने बांधलेले... (अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)