Skip to main content

मनभावन नगाधिराज हिमालय

लेखक खुशि यांनी बुधवार, 27/08/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९९८ सालीप्रथम हिमालय पाहिला पटणीटॉप येथे बर्फाचा तो डोन्गर पाहुन थक्क झाले होते. नन्तर अमरनाथ यात्रा करताना त्या नगाधिराजाचे रौद्बभीशण सौन्दर्य पाहुन मन्त्रमुग्दध झाले होते आणि आदिकैलास-ओमपर्वत यात्रेच्या वीस दिवसात तो माझा मनभावन झाला. हिमालयाच्या विविधतेचे वर्णनतरी कुठल्या शब्दाने करावे?

थोडे अद्धुत थोडे गूढ - ३

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 27/08/2014 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबरचा महीना सुरु होता. थँक्सगिव्हींच्या सुटीचा आदला दिवस. अमेरीकेतील पोर्टलँड इथल्या विमानतळावर एक विमान सिएटल इथे जाण्यासाठी निघण्याच्या तयारीत होतं. नॉर्थवेस्ट ओरीएंट एअरलाईन्सच्या बोईंग ७२७-१०० प्रकाराच्या या विमानाला पोर्टलँड इथून सिएटल इथे जाण्यास साधारणतः अर्धा तास लागणार होता. आपल्या वेळेनुसार दुपारी २.५० वाजता पोर्टलँड विमानतळावरुन या विमानाने टेक् ऑफ घेतला. विमानात एकूण ३७ प्रवासी आणि पायलट-कोपायलट सह ६ कर्मचारी होते. विमानाने टेक् ऑफ घेतल्यावर १८ सी या क्रमांकावरील प्रवाशाने सिगारेट पेटवली (त्यावेळी विमानात धूम्रपानास मनाई नव्हती).

घातक स्युडोमार्ग

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/08/2014 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे! ========= "साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 27/08/2014 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१३ मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! ============= हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

लेखक भाते यांनी मंगळवार, 26/08/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली. माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.

टोलनाक्यावर...

लेखक गवि यांनी मंगळवार, 26/08/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी टोलनाक्यावर उभा असतो. हौसेने नाही राहात. टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब. मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल. उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात. पण मी टोलनाक्यावर उभा असतो. .. तसा मी ब्राह्मणाचा. अण्णाआईसोबत चांगला होतो. अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत. आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली.. मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं. अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर. मग वर्षं वर्षं. एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली..

(तमाशा)

लेखक धन्या यांनी मंगळवार, 26/08/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: गोंधळ साल्या तू बेवडा मारताना तुझे डोळे फार तांबारुन जातात सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर आणि जळमटं पकडलेल्या गंजलेल्या खिडकीतून दिसणारा तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- साल्या तू बेवडा मारताना बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस भरभर शिव्या बाहेर येतात बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात तुझ्या हेलकावे खाणार्‍या शरीराकडे पाहतात मग त्यांचाही डोलकर होतो, आणि सगळाच शिमगा आणि मग सगळ्याचा कसा उगाचंच त

गोंधळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/08/2014 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
सखे तू जवळ नसतांना तुझे डोळे फार गोंधळ घालतात सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं ------ गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र आणि थंड पडलेल्या इवलाश्या खिडकीतून दिसणारी ती लोभस चंद्रकोर... तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात आणि मग फार गोंधळ होतो... सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते झरझर लेखणी शब्द पाझरते... कविता तुझे वर्णन करायला लागते तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते मग तिचाच गोंधळ होतो, आणि सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते नुसताच गोंधळ, आणि मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना माझा सगळाच नाईलाज अ