Skip to main content

तू गेल्यानंतर... तू येईपर्यंत...

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 04/09/2014 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
येताना आणतेस... कळ्या मिटलेल्या चांदण्या निजलेल्या कल्पनाही आणतेस दवात भिजलेल्या... जाताना देऊन जातेस श्यामल निळ्या-सावळ्या आठवणींच्या पाकळ्या आणि एक स्वप्नंही तू गेल्यानंतर... तू येईपर्यंत डोळ्यांत साठवण्यासाठी...!

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 04/09/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आश्रमात बाबा ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही.

आदिकैलास,ओम पर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा भाग ८

लेखक खुशि यांनी गुरुवार, 04/09/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
सातवा दिवस. बुधी ते गुंजी. १७ किमी. उंची १४००० फूट. पहाटे पाच वाजता आमची विनोबा एक्स्प्रेस निघाली पदयात्रेला. बुधी ते छियालेक हा पहिला ३/४ किमी. चा चढणीचा प्रवास. रिमझिम पाऊस, दाट धुके म्हणजे फक्त पायाखालचेही जेमतेम दिसत होते. समोर ४/५ फुटांवर असलेली व्यक्ती दिसत नव्हती, एवढे दाट धुके होते. हा चढणीचा प्रवास दमछाक करणारा आहे. दर १०/१५ फूट चढणीनंतर श्वास शांत होण्यासाठी थांबावे लागत होते. ऑक्सिजनची कमतरता खूपच जाणवत होती, कापूर हुंगत तोंडात पेपरमिंटची गोळी ठेवून चढावे लागत होते. छियालेक खिंड आली. टेकडीवर एक चौकी आणि एक टपरी होती. टपरीत नेपाळी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या, चहाही होता.

सत्याचा जय...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/09/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !

अभिव्यक्त होणे (भाग१ : अभिव्यक्त होण्यास जागा आहे ? )

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 04/09/2014 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) या बद्दल नंतर स्वतंत्र धाग्याने चर्चा करावयाची आहे. तत्पुर्वी अभिव्यक्त होणे असा बर्‍याच जणांच्या तोंडी असलेला वाक् प्रचार चुकीचा असल्याचा शेरा प्रमाण आणि शुद्धलेखनवादींकडून वेळो वेळी येऊन मुख्य चर्चा भरकटत राहते असा अनुभव आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 04/09/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.

रमा-माधव !

. .... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. मग ती इतिहासातली पात्रं असली तरी प्रेम हे प्रेमच असतं. एखाद्या निर्मात्या दिग्दर्शकाला अशा प्रकारचा ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट करावासा वाटणं त्यातही जिथे प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे अशा मराठीत करावासा वाटणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. (कृपया ध्यानात घ्या हे रमा-माधव या चित्रपटाचे परीक्षण नाही.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 04/09/2014 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला. मालिकेतील या दुसर्‍या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 04/09/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.

दूरस्थ

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 04/09/2014 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाला निघायचं म्हटलं की मन कसं हलकं-फुलकं होतं. तसं तर नेहमीच्या त्या रामरगाडयातून बाहेर पडायला मन सदैव उत्सुकच असतं. मनाच्या या उत्सुकतेचं निरीक्षण करताना जाणीव होते ती आदिमानवाची! आपल्या त्या पूर्वजाची! त्याच्यामधली ती भटकी प्रवृत्ती अजूनही आपल्यात जागी आहे अन् संधी मिळताच ती डोकं वर काढते याची जाणीव तीव्रतेने होते. ही संधी मग धंदा-व्यवसायासाठी करण्याच्या प्रवासाची असो की घरगुती भेटीगाठी किंवा कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी असो! क्वचित प्रसंगी त्या विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर या चार भिंतीतून त्या चार भिंतींमध्ये येऊन पडल्याची भावनाही निर्माण होईल. ते पुढचं पुढे!