Skip to main content

आपण का लिहिता?

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न. माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे. सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले.

स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.

अफगाणिस्थान..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/09/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
अफगाणिस्थान.......... ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला.

ब्रह्मांड

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 05/09/2014 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं. आणि मग तू मला भेटलास. "काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस. "तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता? "माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..." "हो" मी म्हणालो. "मी ..

दयेव...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 05/09/2014 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमी कदी घरी जानार हाव?" मी बाबांना विचारलं. घरी म्हणजे गावी, कोकणात. आठवडाभराने गणपती येणार होते. दोन काका, तीन आत्या सारेच मुंबईला. आम्ही पुण्याला. तयारी करण्यासाठी कुणीतरी लवकर गावी जाणं आवश्यक होतं. "येग्दिवस तरी आदी जाया लागंल. आरास कराय पायजे ना." बाबांचं उत्तर. आरास म्हणजे गणपतीच्या बैठकीची सजावट. मी कॉलेजला जायच्या वयाचा होईपर्यंत आमच्या गणपतीची आरास म्हणजे एक दिव्य प्रकार होता. गणपती एव्हढया उंचीवर बसवला जायचा की आम्हा लहान मुलांचा हात गणपतीच्या पायापर्यंतही पोहचत नसे. साधारण १९६० च्या आसपास माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांनी फक्त साडे पाचशे रुपयांत घर बांधले.

मंदिर.....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 05/09/2014 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
"काय हो, आज जेवायचे आहे ना?" "अगं.थांब जरा.तिथे कं.

मिस यू बाप्पा ...

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 05/09/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज तुझ्या मूर्तीच आम्ही विसर्जन केल ..अगदी मिरवणूक काढली ,फटाके फोडले,मंत्रजागर केला ,जागरणाची रोजची सवय लावलीस तू ,बघ ना देवा ,आज झोप पण येत नाहीये,खर तर दरसाल आम्ही तुझा उत्सव साजरा करतो, तुझ्या दर्शनाला येणारे अनेक लोक नवस करतात, एवढी वर्ष मलापण काही न काही हव असायचं,आणि मी मागायचो तुझ्याकडे,पण यंदा मी काहीच नाही मागितल आणि हे मला आता आठवलं..उगाच छान छान वाटत ...मी तुझ्याकडे काहीच मागितल नाही आणि तू मला छान छान असं काहीतरी अदृश देऊन टाकलस....भारीच आहेस हा तू...पण ज्यांनी ज्यांनी मागितलंय त्यांना दे रे ...फारच उदास करतोस रे तू जाताना...हल्ली तुझ्या मूर्तींचे किनाऱ्यावरचे अस्ताव्यस्त पडलेले

पेरू : भाग १० : पूर्णब्रम्ह

लेखक समर्पक यांनी गुरुवार, 04/09/2014 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
पेरूची अन्नसंस्कृती ही अमेरिकेतील सर्वात समृद्ध मानली जाते. लिमा तर 'अमेरिकाज् गॅस्ट्रॉनॉमिकल कॅपिटल' म्हणून ओळखली जाते. हा एकमेव असा सांस्कृतिक पैलू आहे ज्यात नव्या अमेरिकेचे जुन्या अमेरिकेसोबत संघर्षरहित सहअस्तित्व पहावयास मिळते. वसाहतवादाच्या काळात पेरूमध्ये अनेक देशातील लोक विवीध काराणांनी येउन वसले अाणि अापल्याबरोबर नवीन पाककौशल्य घेउन अाले आणि त्यातून ही समृद्ध कला इथे अजून बहरली. उदाहरण, पूर्व अाशियाई लोक इथे आले आणि जन्म झाला 'शिफा' - पेरूव्हियन चायनीज चा.

(स्वामी चेकाळदर्शी उवाच: सनातनीनाम् किम् लक्षणं?)

लेखक मार्क ट्वेन यांनी गुरुवार, 04/09/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
चेकाळदर्शी बाबा ध्यानमग्न बसलेले होते, बहुधा आज संध्याकाळी पाय चुरायला येणार्‍या फिल्मतारकेबद्दल काही चिंतन करीत असावेत. अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी चेकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी सनातनी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी चेकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या वरच्या टोकाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी चेकाळदर्शी: त्या फांदीखाली बघ, त्याखालच्या फांद्याना सनातनी असे म्हणतात.