Skip to main content

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुक-२०१४: विश्लेषण

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 20/10/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ५ - आयगर नॉर्डवांड आणि परिसर

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 20/10/2014 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ हवामानाचे अंदाज बघत दुसऱ्या दिवशी कुठे जावे यावर विचार सुरु होता. डोक्यात होते युंगफ्राउ (Jungfrau) या शिखरावर जायचे. इथवर जाण्यासाठी डोंगरातून रेल्वे मार्ग तयार केलेला आहे जो आयगर (Eiger), म्योंश (Moensch) अशा शिखरांखालुन युंगफ्राउ पर्यंत जातो.

ऐलमा पैलमा

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 20/10/2014 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. मधुरा देशपांडे हिची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ऐलमा पैलमा लेखिका: अनाहिता __________________________ थोड्याच वेळात आपण मुंबईच्या छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू अशी वैमानिकाने सूचना केली. पहाटेची वेळ होती. अजून सूर्योदय व्हायचा होता. दिव्यांनी मुंबई लखलखत होती. माईआजी मायदेशी उतरण्यास आतुर झाली होती. अनेक आठवणी दाटून आल्या होत्या.

Worth a Hundred words

लेखक एस यांनी सोमवार, 20/10/2014 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
g

महाराजांचा दक्षिण दिग्विजय

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 20/10/2014 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील.

नित्यनूतन दीपावली - भरत उपासनी

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री भरत उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 20/10/2014 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या सत्तेचा निकाल मतदारांनी दिलेला आहे पण ह्या निकालाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे . आता तुम्ही बोलाल आपण का करावे हे तर राजकीय पक्षाची गरज आहे आणि काम आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीसोबत प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे मग तो मतदार असो व राजकीय पक्ष .

ओळख बहारिनची

लेखक विशाखा पाटील यांनी सोमवार, 20/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्‍यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार. या देशाच्या एका टोकाला खजुराच्या वाड्या; तर दुसर्‍या टोकाला वैराण रखरखीत वाळवंटाचा पसारा. मूळ बहारीनींएवढेच परदेशी नागरिक या देशात राहातात. या सर्वांची मिळून लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास आहे. परदेशी लोकांमध्ये सर्वात जास्त भारतीय.

विचारशृंखला - संजय उपासनी

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!) ***************** * विचारशृंखला * ****************** आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत..... पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत.... आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........ खूप चालावे म्हटले तर पाय भरून आलेत........ मन आणि विचार सरभेसळ होत चाललेत .....