Skip to main content

चिनी चित्रकार आणि नेपाळी छायाचित्रकार

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी मंगळवार, 28/10/2014 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी माझी भलतीच निराशा झाली, सारसबागेत दीपोत्सव असतो दर वर्षी...सुंदर आकारात मांडलेल्या पणत्या ही खरच मेजवानी असते डोळ्यांना, खास करून पहाटे ४-६ या वेळेतल्या अंधारात. त्यातूनही त्या प्रकाशात मधेच अनेक प्रसन्न, गोड चेहरे पाहून अधिकच छान वाटायला लागतं. पणत्या लावण्यासाठी लोकं मध्यरात्री २ पासून जागा धरून ठेवायला कमी करत नाहीत. आणि नंतर मात्र creativity चा जो काही कस लावतात ना...कमाल!! पण आजचा चित्र वेगळच होतं, तोच canvas ठेऊन चित्रकार बदलल्यासारख बदललेलं चित्र...चिनी लोकांचं आपल्या बाजारपेठेतल आक्रमण. ५० रुपयाला मिळणारा तो हॉट एअर बलून. सगळीकडे तेच तेच आणि तेच. एका दिवाळीत चित्र बदलल.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ६ - इंटरलाकेन आणि विल्डर्सविल

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 28/10/2014 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते.

दोन गिलास पाणी !

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 27/10/2014 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते.. दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते.

आयुष्यः एक मृगचक्र!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 27/10/2014 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय? जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग... त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो... आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही. आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही... जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही. निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.

अंधार क्षण भाग २ - प्रतिकार (लेख ५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 27/10/2014 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग २ - प्रतिकार या भागातल्या कथा ह्या आक्रमकांच्या  अत्याचारांविरुद्ध उभ्या राहाणा-या आणि त्यांचा प्रतिकार करणा-यांच्या कथा आहेत. दुस-या महायुद्धातल्या प्रतिकार चळवळींचा इतिहास पाहिला तर आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतील - एक म्हणजे आपल्या तत्वांवर ठाम असलेले आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कुठलीही तडजोड न करणारे; आणि दुसरे कुंपणावर बसलेले आणि थोड्याफार स्वार्थी किंवा व्यक्तिगत हेतूंपायी प्रतिकार चळवळीत आलेले. माझा असा विश्वास आहे की पहिल्या प्रकारचे लोक दुर्मिळ होते. अशा चळवळी  मुख्यत्वेकरून दुस-या प्रकारच्या लोकांनीच भरलेल्या होत्या. फ्रान्सचंच उदाहरण घ्या.

दिवाळी - वैचारिक क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 26/10/2014 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
चाईनीज बॉम्ब जोरात फुटला कानाचा परदा कुणाचा हो फाटला. फटाक्यांचा धूर आकाशी दाटला खोखलत-खोखलत कुणाचा प्राण गेला. आधी केली साफ -सफाई मग पसरविला कचरा दिवाळीचा सण मोठा असा साजरा केला.
काव्यरस

पिंपळ (रहस्य कथा) - भाग २

लेखक खोंड यांनी रविवार, 26/10/2014 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
pimpal मगिल भागः पिंपळ (रहस्य कथा) - भाग १ "कोण पाव्हणं म्हणायचा … " जड आवाजात पहिला प्रश्न पडला. "मी …. " एवढं बोलून तो थांबला. आलेल्या व्यक्ती कडे निरखून पाहू लागला ६ फुट उंच. वजनदार. पहिलवानाला साजेल अशी शरीरयष्टी. पिळदार मिशा. अंगात बंडी. गूढग्या पर्यंत धोतर. हातात काठी. "काय नाव … ?" यशवंत उर्फ येशा म्हणाला. ताम्भाखुचा बार भरला.

रन राहुल रन...!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 26/10/2014 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
.................................................................. सुरुवातीच्या काळातील लिखाण, थोडेफार सत्यघटनेवर आधारीत. .................................................................. रन राहुल रन...!! धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते.

चेतन भगत आणि त्याची पुस्तकं

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 25/10/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हा एक वेगळाच प्रकार आहे. नेहमीची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांशिवाय इतरही बरीच ' इंटरेस्टिंग ' पुस्तकं तिथे दिसतात. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं; काॅमिक्स; ' हाऊ टू ' प्रकारातली पुस्तकं; वशीकरण, इंद्रजाल, लाल किताब असले डोक्याला शाॅट असणारे प्रकार; पाककृती; चाणक्यनीती; अकबर-बिरबल वगैरे भरपूर मालमसाला या स्टाॅल्सवर बघायला मिळतो. एकाच ठिकाणी मुन्शी प्रेमचंद आणि सुरेंद्र मोहन पाठक सारख्या दोन टोकाच्या लेखकांच्या कादंब-या तुम्हाला रेल्वे स्टेशन स्टाॅलवरच सापडतील. ज्याला टाईमपास लिटरेचर म्हणून अभिजनवादी नाकं मुरडतात, त्यातलं बहुतांशी वाङ्मय इथे मिळतं.