आयुष्यः एक मृगचक्र!
आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय?
जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग...
त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो...
आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही.
आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही...
जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही.
निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.
किंवा मग जगासाठी आपण अस्तित्वात नसतो!
यापैकी जे खरे असेल ते असो, पण आपण या जगात अस्तित्वात असेपर्यंत इतरांनी आखून दिलेल्या किंवा नियतीने आखलेल्या त्या चक्रव्यूहात गुरफटत जातो...
सतत हे चालू असते. चोवीस तास, सातही दिवस!
तुम्ही म्हणाल अर्धा दिवसा तर आपण झोपतो...
पण आपण का झोपतो?
अहो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा चक्रव्यूहाचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी विश्रांती मिळावी म्हणून..
काही जण तर झोपेचे तास सुद्धा कमी करतात या चक्रव्युहा साठी!!!
आणि ते सुद्धा अशा गोष्टींच्या मागे धावण्यासाठी की ज्या आपल्याला या जगाताच सोडून जाव्या लागणार आहेत हे आधीपासून माहीत असते...
तरीही त्या आपण मिळवण्यासाठी धडपड करतो..
नाही केली तरी हे जग आणि त्यातले लोक आणि त्यांचे नियम हे सगळे आपल्याला तसे करायला भाग पाडते...
म्हणजे मृगजळा च्या मागे धावायला भाग पाडते...
त्या चक्रव्यूहात गुरफ़टायला भाग पाडते...
काही जण चक्रव्युहाच्या ध्येयापर्यंत म्हणजे मृगजळापर्यंत पोहोचातात...
काही वाटेतच हार मानतात...
काही तेथे योग्य वा अयोग्य मार्गानी पोहोचतात...
तर काहीजण चक्रव्युहाची रचनाच बदलायला निघतात...
यातून सुरु होतो जीवघेणा प्रवास, जीवघेणी स्पर्धा..एकमेकांचा छळ किंवा वापर....!!!
मग ते एकमेकांचे मित्र, ऑफिस मधले सहकारी, बॉस असोत की मंत्री, कार्यकर्ता, सामान्य जनता असो की मग पती पत्नी, बहिण भाऊ, मुलगा सून जावई सासू सासरे असो...
सगळेच धावत आहेत त्या आपापल्या मृगजळा च्या मागे!!
वाचने
3254
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
कोणी मराठी मधे अनुवाद करेल का
In reply to कोणी मराठी मधे अनुवाद करेल का by प्रसाद१९७१
हेच म्हन्तो
In reply to कोणी मराठी मधे अनुवाद करेल का by प्रसाद१९७१
गुड जोक
(No subject)
अरे भई कहना क्या चाहते हो
midlife crisis???
वरील सर्वांशी सहमत. लेख वाचला
भावना पोहोचल्या.
छान गोल गोल लिहिलं आहे. मी
छान गोल गोल लिहीलय
In reply to छान गोल गोल लिहीलय by जेपी
तुम्हाला त्यातून जिलबीचा बोध
In reply to तुम्हाला त्यातून जिलबीचा बोध by सतिश गावडे
@माझा रोख कवीच्या "आयुष्य हे
साईबाबांचं गूढ बोलणं फक्त त्यांनाच कळायचं....
पण आपण का झोपतो?
In reply to पण आपण का झोपतो? by आदूबाळ
आम्हाला पण सांगा ना. प्लिज...
In reply to आम्हाला पण सांगा ना. प्लिज... by सतिश गावडे
पहिल्यापासून या वाक्यापर्यंत
वर्तुळाचे दुसरे टोक सापडत
In reply to वर्तुळाचे दुसरे टोक सापडत by विवेकपटाईत
>> चार्वाकचा आदर्श समोर ठेऊन
४ वाक कोण ?
निमिषराव मी काय म्हणतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen