Skip to main content

.....रिप रिप रिप ! !

लेखक फिझा यांनी बुधवार, 12/11/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
रिप रिप रिप........ मोड़कळिला आलेले घर त्या गल्लीतले शेवटचेच, अजुनही चातक बनुन चिवटपणे उभे असलेले , कालच्या पावसाने पुन्हा एकदा झोड़पले पाऊस नेहमी सारखाच.... ..........रिप रिप रिप खिड़कीची धूसर झालेली काच आधीच तडकलेली.. आता नि:शब्द! पावसाच्या एक एक थेंबाला रस्ता दाखवत ती चिर .....कृतार्थ ! जुनाट चौकट भिजलेली... सगळंच ... ..........रिप रिप रिप पाउस आणि अंधार सोबतीला एकटी....

सल्ला हवाय

लेखक बार्नी यांनी बुधवार, 12/11/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ?

पाठलाग..

लेखक बोबो यांनी बुधवार, 12/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

घालीन लोटांगण

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 12/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ७

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 11/11/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/11/2014 22:47 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय - अंधार छाया

मित्रांनो, नुकतेच ईसाहित्य प्रतिष्ठान च्या सौजन्याने अंधारछाया ही कादंबरी ईबुक रूपुात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अल्पपरिचय सादर. ही कादंबरी मोफत डाऊन लोड करायची सोय आहे. इच्छुकांनी ई साहित्य.कॉम वर किंवा मला विचारणा केली तर ती मी आपल्याला मिळवून द्यायची सोय करू शकेन.

इंटरस्टेलारच्या निमित्ताने...

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 11/11/2014 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरस्टेलार हा मी भारतातील थियेटरला पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट. एका हॉलीवूड चित्रपटवेडया मिपाकर मित्राच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत हा चित्रपट पाहायला गेलो. इंग्रजी चित्रपटातील उच्चार कळत नसल्यामुळे चित्रपट कितपत समजेल याबद्दल साशंक होतो. मात्र चित्रपट सुरु होताच पडद्याच्या खालच्या बाजूला इंग्रजी सब टायटल्स दिसू लागली आणि मी निश्चिंत झालो. चित्रपट अतिशय सुंदर असल्यामुळे नजर पडद्यावर खिळली होती. काही प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावत होते. आता पृथ्वीचा विनाश जवळ आला आहे.

ही वाट भटकंतीची: १२ हिमाचल

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 11/11/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वर्षी नोव्हे-डिसे मध्ये महाराष्ट्रा बाहेर फिरायला जायचे असे ठरवले होते, पण काही कारणाने या काळात जाता न आल्याने वाईट वाटले. आणि मग त्याची कसर भरुन काढण्यासाठी उन्हाळ्यात कोठे फिरायला गेले पाहिजे याची लिस्ट काढणे सुरु झाले. काश्मीर की हिमाचल या २ ठिकाणांपर्यंत फायनल झाले. पण नक्की कोठे जायचे ते काही फायनल होईना. सरते शेवटी हिमाचल (शिमला.. कुल्लू..मनाली) ला जाण्याचे ठरवले. पुन्हा उन्हाळ्यात जायचे म्हणजे, मुलांच्या (दूसर्‍यांच्या) परीक्षा संपलेल्या, लग्न झालेली उत्साही मंडलींची गर्दी हे टाळलेच पाहिजे असे वाटले. त्यामुळे प्लॅन थोडा आधी करावा असे वाटले.