Skip to main content

छावणी - ४

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 24/11/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रँड ट्रंक रोड हा उत्तर हिंदुस्तानातील वाहतुकीचा सर्वात जुना मार्ग. प्राचीन काळी सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळात या मार्गाच्या काही भागाचं बांधकाम झालं होतं. तेव्हा हा मार्ग उत्तरपथ म्हणून ओळखला जात असे. मौर्यांची राजधानी असलेल्या पाटलीपुत्र (पटना) पासून ते वायव्य सरहद्द प्रांतातील तक्षशीला शहरापर्यंत हा मार्ग होता. १६ व्या शतकात शेर शहा सुरीने या प्राचीन मार्गाचं पुन्हा बांधकाम केलं. मुघलांच्या काळात या मार्गाचा वायव्येला खैबर खिंडीतून काबूलपर्यंत आणि पूर्वेला चितगावपर्यंत विस्तार झाला. ब्रिटीश सरकारने या मार्गाचा विस्तार आणि पुनर्बांधणी केली.

अंधार क्षण भाग ३ - मसायो एनोमोटो (लेख १३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 24/11/2014 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - मसायो एनोमोटो इतिहासातलं एक प्रबळ साम्राज्य स्थापन करणा-या रोमन लोकांना एक चिंता अशी वाटायची की आर्थिक प्रगतीमुळे त्यांच्यातली विजिगिषु वृत्ती कमी होईल. लोकांचा स्वभाव मृदू होईल. त्यांच्यातला कठोरपणा निघून जाईल. मला त्याच्या बरोबर उलट चिंता वाटत असते की  मानवी अध:पाताच्या कथा वारंवार ऐकून माझ्या संवेदना बोथट होतील की काय. पण २००० साली टोकियोमध्ये मी मसायो एनोमोटोची मुलाखत घेतली आणि माझ्या लक्षात आलं की असं काहीही झालेलं नाही, कारण या कथेतल्या तपशिलाने मला अजूनही पछाडलेलं आहे. मसायो एनोमोटो एका शेतक-याचा मुलगा होता आणि वयाच्या १७ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला.

कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला - माझा मिपावरील श्री गणेशा

लेखक दिप्स यांनी रविवार, 23/11/2014 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज मिपावर माझा पहिला लेख टाकताना खूप आनंद होत आहे. खर तर काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा जुन्या जाणत्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन करावे हि विनंती. गेली जवळपास दिढ वर्ष मी मिपाचा नियमित वाचक आहे. तेव्हा वेगवेगळ्या विषयावरचे एक से बढकर एक लेख वाचताना वाटायचं आपण हि प्रयत्न करून बघावा. आता तो योग जुळून आला आहे, परवा माझा वाढदिवस झाला त्यावेळी केलाला एक संकल्प कि - बाकी काही नाही तरी प्रवासवर्णन लिहावे. तर मग करूया सुरुवात.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

लेखक चतुरंग यांनी रविवार, 23/11/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.

अमृतसर - १

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 23/11/2014 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमृतसर म्हणताच डोळ्यापुढे येते ते जलियाँवाला बाग, सुवर्णमंदिर आणि अटारी सरहद्द. अमृतसरला मध्ये भटकंतीत अग्रक्रम अर्थातच जलियाँवाला बागेचा. j1 j2 जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या.

B .P . वर गावठी इलाज

लेखक रमेश भिडे यांनी रविवार, 23/11/2014 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मला B .P . चा त्रास आहे असे एका operation च्या आधी आढळले .म्हणून २ दिवस गोळ्या देऊन B .P .

धोतर आणि तांब्या

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 23/11/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल

वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत

लेखक देशपांडे अमोल यांनी रविवार, 23/11/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय. ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का? एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ? तसं मी बर्‍या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन. आपली मते जाणण्यास उत्सुक. कळावे.आभारी.

निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना.

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 23/11/2014 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुमार पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट, छोटस घर, घरा समोर लहानस आंगण. पेरूचे झाड, मधुमालतीची वेल आणिक गमल्यांमध्ये असलेले गुलाब. सकाळ- संध्याकाळ चिमण्यांची चिवचिव, त्यांना दाणा घालण कधी कधी येणाऱ्या फुल पाखरां मागे धावण मुलांचा छंद. पण माणूस मुळातच स्वार्थी, अतृप्त, असमाधानी. माझ्या सारखा शुद्रजीव ही त्याला अपवाद नाही. पोर मोठी होऊ लागली होती, जागेची उणीव भासत होती. तसे ही, शेजारी-पाजार्यांनी पूर्ण वरांडे कवर केल्यामुळे घरात ऊन ही कमी येत होते. आपण ही समोर मोठी खोली बांधली तर घराला शोभा येईल - बैठकी साठी त्या खोलीचा वापर करता येईल, असा विचार सतत मनात येत होता.

कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 23/11/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात.