Skip to main content

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/12/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ भगवंत म्हणतात: १. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे २. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. ३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण.

देव भूमी ........भाग-०४

लेखक मॅक यांनी सोमवार, 08/12/2014 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
देव भूमी- भाग-०४ केरळ मधील आणखी काही फोटो........ प्रचि--- ३८ प्रचि--- ३९ प्रचि--- ४० प्रचि--

देव भूमी ........भाग-०३

लेखक मॅक यांनी सोमवार, 08/12/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
देव भूमी.....भाग-०३ पुढे दुपारी जेवन करून मुन्नारच्या दिशेने जाताना वाटेत एका मसाल्याच्या खेड्याला (बागेला) भेट देऊन केरळचे प्रसिध्द असे मसाले खरेदी करण्याचा आनंद घेतला....त्याच बरोबर केरळच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेत-घेत मुन्नारच्या दिशेने मार्गक्रमण केले........

ती गच्चीवरची झाडं.

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 08/12/2014 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल ह्यात काय नवीन आहे, काय विशेष आहे ? तर विशेष अस काही नाही, साधी झाडंच आहेत ती. पण मला जरा वेगळी वाटली, कशी ? ते सांगावास वाटलं, म्हणून हा तोकडा का होईना प्रयत्न. आता इथे, फिलीप्पिंस मध्ये येयून मला जवळ जवळ दीड वर्ष होत आली. वयाच्या ३० व्या वर्षी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो, ते सुद्धा थेट घरापासून हजारो मैल दूर. आत्तापर्यंत मी घरच्यांबरोबरच राहत होतो, सगळ जागच्या जागी मिळायच, व्यवस्थित, अगदी ऑफिसमधून घरी गेल्या गेल्या, गरम गरम जेवण पुढ्यात आणून आई ठेवायची, सकाळी ऑफिसच्या बस ला सोडायला न चुकता भाऊ हजेरी लावायचा. अगदी सुखाच आयुष्य.

जादूगार डाइनमो

लेखक कंजूस यांनी सोमवार, 08/12/2014 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रैडफॉर्ड इंग्लडचा लोकप्रिय जादूगार DYNAMO याचे जादूचे प्रयोग HISTORY TV CHANNEL 18 वर दाखवतात. युट्युबवरही पाहता येतात. आतापर्यँत चौदा मोठे शोज झाले आहेत. त्याच्या गाजलेल्या जादूंमध्ये या आश्चर्यकारक ठरल्या आहेत: १)थेम्स नदीवर चालणे. २)कागदाची फुलपाखरे जिवंत करणे. ३)रिओ डि जाने मध्ये हवेत उडणे. ४)टाईम्स स्क्वेअरमध्ये एकाच वेळी एकाच नंबरवरून शेकडो लोकांना कॉल येणे. ५)कारंज्याचा पाण्याचा बर्फ करणे. तुम्ही या डाइनमोचे कार्यक्रम पाहिलेत का ? मागच्या वर्षी तो वाराणसी आणि धारावीत येऊन गेला होता . आता क्रिसमसला नवीन शो दाखवतील असे वाटते.

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/12/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
_________________________________________________________________________________ मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 08/12/2014 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!

अंधार क्षण भाग ४ - पीटर ली (लेख १७)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 08/12/2014 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - पीटर ली ऐतिहासिक घटना समजून घेण्यातलं एक आव्हान म्हणजे भूतकाळ आणि आपण स्वतः यांची सांगड घालणं किंवा स्वतःची भूतकाळात कल्पना करणं. आपल्याला अशा जगाचा विचार करायला लागेल जिथे आज आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो - इंटरनेट, विमानप्रवास, मोबाइल फोन - त्या तर नव्हत्याच पण लोकांची मूल्यव्यवस्थादेखील पूर्णपणे वेगळी होती. जर माझ्या आईवडिलांच्या पिढीचा विचार केला तर ही पिढी दुस-या महायुद्धाच्या वेळी तरूण होती आणि  सूर्य न मावळणारं  ब्रिटिश साम्राज्य अनुभवणारी शेवटची पिढी होती.