Skip to main content

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/12/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे. नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही. पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही. वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही. सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही. पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्याला जे साध्य होत नाही त

नाव

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 10/12/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव http://kalamnaama.com/nav/ नाव नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे? नाव का असतं? इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय? नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का? एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय?

अत्तरायण..! भाग - २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 10/12/2014 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। पुढे चालू..... ==================== २) अत्तरफूल :- काय वाटतं नाव ऐकल्यावर? गोंधळात पडायला होतं ना? पण हे अत्तर ज्याचं आहे..त्या फुलानीच आजवर कित्येकांना गोंधळात टाकलय. कित्येकांचे गोंधळ सोडवलेत,वाढवलेतंही! मी ही पहिल्यांदा गोंधळलोच होतो. (आणि तो गोंधळाचा प्रसंग मला पुन्हा आठवून दिला तो एका गोंधळ्यानीच!) म्हणजे ही केवळ शब्दक्रीडा नव्हे.

माझे पहिलेच प्रवास वर्णन - फिलीपाइन्स

लेखक Madhavi_Bhave यांनी मंगळवार, 09/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
(मी फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे, http://www.misalpav.com/node/13573 श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार flickr वर upload करून टाकले आहेत. आशा आहे नाहीतर मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.) हे माझे पहिलेच प्रवास वर्णन आहे. झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे. एस्पिकचा एक्का व इतरांप्रमाणे माझी ओघवती भाषा वगैरे नाही आहे तरी सांभाळून घेणे. मी जानेवारी २०१३ मध्ये फिलीपाइन्सला २-३ दिवसांसाठी office च्या कामासाठी गेले होते. Airport अगदीच सामान्य होता पण देश मात्र प्रथम दर्शनीच प्रेमात पडावे असा.

जडण-घडण 15

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 09/12/2014 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मार्केटमध्ये कंपनीचं चांगलंच नाव झालं होतं. मला आठवतंय, त्या वर्षी दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारातल्या १०० पेक्षा जास्त शुभेच्छापत्रांसाठी मी संदेश लेखन केलं. यात आकार वैविध्याबरोबर पॉप अप, विनोदी, कॉर्पोरेट अशा प्रकारांचाही समावेश होता. एकंदर घोडदौड वेगात सुरू होती. मागच्या भागात सांगितलेल्या द्व्यर्थी किंवा काहिसे अश्लील शुभेच्छा संदेश लिहिण्याचं सुचवणाऱ्या त्या प्रसंगानंतर माझी एकंदर प्रतिक्रिया लक्षात घेत तो विषय तिथेच संपला होता. मला त्या वेळी घड्याळं जमवायची आवड होती. पण ही घड्याळं मनगटावर कमी आणि माझ्या डेस्कवर जास्त वेळ दिसायची.

जागो ग्राहक जागो....

लेखक मोदक यांनी मंगळवार, 09/12/2014 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली.. आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने... या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया..

दुकानदाराकडून अपमान..

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 09/12/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो.

गृहकर्जाबाबत बँकेचे नियम

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 09/12/2014 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो. मी नुकतेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची रक्कम रू. ३५ लाख. बँकेच्या पद्धतीनुसार आधी कर्जाच्या रकमेच्या चेकची छायाप्रत देण्यात आली. त्यावर मी १५ नोव्हें रोजी विकणार्या मालकांबरोबर सेलडीड केले. मग दोघांच्या सवडीने दि. २९ नोव्हें रोजी अ‍ॅपॉइंटमेंट घेऊन बँकेत गेलो व सेलडीड दिले. तेंव्हा प्रत्यक्ष चेक मालकांना देण्यात आला. तो त्यांनी दोन दिवसांनी भरला. मग तो त्यांच्या खात्यावर जमा झाला दि. ४ डिसें रोजी. मी जेंव्हा आता स्टेटमेंट पाहिले, तेंव्हा माझ्या खात्यावर दि. ११ नोव्हें पासून ३० नोव्हें पर्यंतचे व्याज, जे रू. १८,५०० आहे, ते डेबीट दाखवले आहे.

HATS ऑफ टू फिलीपिनोज,

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 08/12/2014 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेली चार दिवस नुसत प्रत्तेक लोकलच नाही तर इंटरनेशनल न्यूज चानेस्ल वर, वृत्तपत्रात, सगळीकडे, एकच चर्चा, “रुबी” (इंटरनेशनल नाव Hagupit) येतंय. त्याच्याशी लढण्यासाठी पिनॉय (फिलिपिनो लोक) सज्ज होत आहेत. ह्या बद्दल बोलण्या अगोदर थोडी या देशाची ओळख करून घेऊयात. फिलिपिन्स – थोडी ओळख नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल फिलिपिन्स हा जवळ जवळ 7,107 लहान मोठ्या बेटांचा समूह. एकूण क्षेत्रफळ ३००,००० स्क़्वेर किमी. एकूण लोकसंख्या १०० मिलिअन (जगातील १२ वा सर्वात जास्त लोक्संखेचा देश, आणि आशियातला ७ वा) आणि, वेगवेगळ्या देशात विस्थापित झालेल्यांची संख्या जवळ जवळ १२ मिलिअन.