Skip to main content

निळाई...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 07/01/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित... माझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे, पण आहे एवढं खरं... मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, समांतर सिनेमाचा 'ब्ल्यु आईड बॉय फारुख शेख असो, निळ्या डोळ्यांची ऐश असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं ! ग्रेसची एक कविता आहे 'निळाई' ! असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो? या 'निळाई'च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये.

मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 07/01/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य "विकु" यांची मापी मागून…आणखी येक जिल्बी :D पेर्णा - http://www.misalpav.com/node/29907 --------------------------------------------------------------------------------- मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला मित्रालाच सांगतो, (थोडी) पीत जा...

Full and Final Settlement बद्दल सल्ला पाहिजे …

लेखक योगेश९८८१ यांनी बुधवार, 07/01/2015 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, इंटरनेटवर सल्ला मागण्याची आणि मिपा वर लिहिण्याची ही माझही पहिलीच वेळ, अपेक्षा आहे कि तुम्ही सांभाळून घ्याल …. मी मुंबईला Sep २०१० ते Sep २०१२ एका IT कंपनी मध्ये काम करत होतो. काम सोडताना रीतसर सोडलं आणि नवीन MNC कंपनी जॉईन केली. परंतु आता अडीच वर्ष झले तरीही जुन्या कंपनी कडून FnF पेंडिंग आहे साधारण १,००,०००/- (२ महिन्याची salary) कंपनी सोडल्यावर ८-१० महीन्यांनी योग्य ती PF रक्कम मिळाली परंतु अजूनही वरती सांगितल्या प्रमाणे दोन महिन्यांचा संपूर्ण पगार बाकी आहे.

लोकमान्य चित्रपट ! हिप्पीछाप रिमिक्स

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 07/01/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.

लोकमान्य टिळक एक युगपुरुष !

लोकमान्य टिळक एक युगपुरुष. टिळक मोठे चित्रपट अगदी छोटा. प्रत्येकाच्या मनात लोकमान्यांची एक प्रतिमा असते. ती अधिक प्रकाशमान करून घेण्यासाठी आपण चित्रपटाला येतो. पण इथे ती अपेक्षा पूरी होत नाही. लोकमान्य टिळक हा विषय आणि चित्रपटाचे माध्यम अशा सोन्यासारख्या गोष्टी रिमिक्स किंवा हिप्पीछाप हाताळणीने वाया घालवलेल्या आहेत.

चित्रकृती

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 06/01/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) } काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही.

माझा गाव ... (यात्रा... )-- ०१

लेखक मॅक यांनी मंगळवार, 06/01/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महीना असल्यामुळे आणि ब-याच रजा शिल्लक असल्यामुळे वर्षाच्या शेवटी सुट्टी काढायच निश्चित केला होत...

आजोळच्या गोष्टी – ३

लेखक गुळाचा गणपती यांनी मंगळवार, 06/01/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजोळच्या गोष्टी – ३ औदुंबरला दत्त मंदिराशेजारूनच संथ वाहते कृष्णामाई. नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. काठाला नारळाची जांभळाची झाडे एका रांगेत होती. एकदा आईने माझ्या मामाला मला पोहायला शिकवायची जबाबदारी दिली आणि माझा पोहणे शिकण्याचा उपक्रम पुढे अनेक वर्षे चालला. माझा एक मामा अगदी पट्टीचा पोहणारा. पुरात उडी टाकून भोवरा हाताने फोडणे वगेरे धाडसी प्रकार सहज करी. मी त्याला घाबरून असायचो अगदी. मी २-३ वर्षाचा असताना माझे बुडता बुडता वाचण्याचे सोपस्कार झाले होते. मामाने अगदी मजेत सांगून टाकले आईला कि "छाया, काळजी नको. आता हे काम माझ्याकडे लागले".

सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 06/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय.

एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/01/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.

उनाड भटकंती : मढेघाट

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/01/2015 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
इतरत्र पूर्वप्रकाशित ... "रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन" रेडिओवर किशोर चिंब करत गात होता. तसं पाहायला गेलं तर गाण्यात अपेक्षित असलेली 'अगन' लागण्याची (आणि लागलीच तरी दाखवण्याची) आता फारशी संधी उरलेली नाहीये. पण हा पावसाळा तसा कोरडाच गेलेला होता. सद्ध्या ट्रेक्स तर पूर्णपणे बंदच झालेले आहेत. या वर्षी फारसे कुठे आऊटींगलाही जाणे झालेले नव्हते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कुठेतरी उंडगायला जावून पावसात मनसोक्त भिजायची 'अगन' मात्र मनात लागलेली होती. नुकताच आजारातून उठलेलो असल्यामुळे बाहेर कुठे जायला मिळेल याची शक्यता नव्हती.