Skip to main content

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 29/01/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा .. निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा .. गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा .. भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा .. .
काव्यरस

इराकची खातून

लेखक विशाखा पाटील यांनी गुरुवार, 29/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री.

शांत गाणी....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 29/01/2015 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत. मराठी.... १. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE) २. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw) ३.

पाऊस आठवणींचा…

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 29/01/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक पाऊस आला, सगळ्यांनाच भिजवून गेला… एवढी कसली घाई होती बाबा, हिवाळ्यातच पडून गेलास… बरं येताना तू एकटा कधी येत नाहीस, सोबत तिच्या आठवणीही घेऊन येतोस… तू आपला पडून जातोस, आणि मला मात्र कासाविस करतोस… घरातच बसून मी बाहेर तुला पडताना पहात राहतो, तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबात मला तिचाच चेहरा दिसत राहतो… कधीतरी कडाडणाऱ्या विजेसोबत मी नक्षी आठवणींची विणत राहतो, अश्याच कुठल्यातरी जुन्या पावसात मग मी देखील हरवून जातो… तेव्हा देखील तू असाच यायचास कोणालाही न सांगता, मग मी ही निघायचो तिच्याकडे कुठेही न थांबता… मग आम्ही दोघंही भिजत राहायचो तू थांबेपर्यंत, अरे!

बिशी बेले भात

लेखक आरोही यांनी बुधवार, 28/01/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी तांदूळ, १ वाटी तुरडाळ ,वांगे १ ,टोमाटो १,कांदा १,फरसबी ,गाजर,वाटाणा,लाल भोपळा आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता .तेल ५-६ चमचे ,मीठ चवीनुसार ,चिंचेचा कोळ १ चमचा ,शेंगदाणे आवडीप्रमाणे ,४-५ कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर,सुक्या लाल मिरच्या २,पाणी आणि सर्वात महत्वाचे एम .टी.आर चा बिशी बेले मसाला ३ चमचे . 1 माझ्याकडे मातीचे भांडे असल्याने मी काही पदार्थ बनवताना आवर्जून यात बनवते त्यातच हा भात हि येतो कारण मातीच्य

डु आयडी आणी चपला

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 28/01/2015 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?

साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 28/01/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू. अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

लेखक गवि यांनी बुधवार, 28/01/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच.

श्वानहिरो

लेखक जागु यांनी बुधवार, 28/01/2015 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता. नवोदित श्वानपिलाचे कोडकौतुक जोरात चालू होते. वापरात असणाऱ्या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण-पांघरुणाची अभिषेकने सोय केली.