Skip to main content

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 10/02/2015 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.

रिबटेबल प्रिझंप्शन

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 09/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला. "हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही." तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे. "याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला. "तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं. आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी.

एक इंटर्व्ह्युचा दिवस

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/02/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती.

क. सांगता येत नाही

लेखक जातवेद यांनी सोमवार, 09/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
असो. आता या पुलाखालचं नुस्तं पाणिच काय अख्खा पुल वाहून गेल्यात जमा झाला आहे कदाचित कोरड्या प्रवाहामुळेपण पुल पडत असतो अशा ह्या विचित्रपणाचा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय म्हणलं ठिकाय, आपण आता नविन पुल बांधुया ठरलं तर. पण नविन पुल बांधायचा कुठे जुन्या पुलाचा पाया तर काढता येत नाही तसही इथे पाणि कुठाय?

वैदिक काळातील वीरांगना

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/02/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला.

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

दोस्ताना!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/02/2015 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक पुस्तक दिसल... 'एका मैत्रीची कहाणी'... नाव होत.. 'मैत्री'त कहाणी कशी असेल? 'कहाणी'तली मैत्री कशी असेल? कुतूहल माझ जागं झाल... पुस्तक माझ्या घरी आल! तेवढ्यात पक्या घरी आला... दोस्तीची 'आण'देऊन पान खायला घेऊन गेला... 'साल्या तुझी तंगी हाय? दोस्त न तुझा? सांगायच नाय?' जीव आत कसानुसा झाला... 'याला कोणी सांगितल?' प्रश्न मनात आला... मुलांची फी.. आईच् आजारपण.. बायकोची नोकरी गेली... राहाते राहिलो कमावते आपण.. पैसा पूरा पडेना... आयुष्यच तंग.. काहीच मला बोलवेना... उलाघाल मनाची... दोस्ताला कळली... 'तू नाही बोललास... काल आई भेटली... साल्या दोस्ती आपली फार जुनी हाय.. तुझ्यामुळे बुकं शिकलो..

जडण-घडण 19

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 09/02/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंरचे दिवस मात्र काहीसे अस्वस्थ करणारे होते. झालं काय, तर मी गिफ्ट नाकारल्याचं विद्यार्थ्यांकडून पालकांना आणि अर्थात माझ्या सहशिक्षिकांनाही समजलं. काही पालक हटवादीपणे दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर स्वत:च गिफ्ट घेऊन आले. पण मला ते पटणार नव्हतंच. त्या भेटी मी अर्थात स्वीकारल्या नाहीत. माझ्यापुरता तो विषय संपला, पण माझ्या सहशिक्षिकांनी मात्र त्यावरून मला टोमणे मारायला सुरूवात केली. खरं तर त्या सगळ्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या, वयानेही आणि सेवाज्येष्ठतेनेही. मी काही त्यांना प्रत्युत्तर द्यायच्या भानगडीत पडले नाही. कालांतराने ते ही मागे पडलं. विद्यार्थ्यांशी उत्तम नाळ जुळली होती.

ई शॉपिंग - बिचारे डिलिव्हरी वाले

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 09/02/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता थोड्यावेळापूर्वी एका मिटिंग ला जातांना ऑफिस रिसेप्शनमध्ये दुसर्या कलीग साठी थांबलो होतो ...तर तिथे रिसेप्शन मध्ये एका ई शॉपिंग वाला मुलगा डिलिव्हरी साठी बसलेला पहिला ...५-१० मिनटे हातात होती म्हणून कुतूहलापोटी नीट पहिले तर साधारण २.५ x २.५ x २.५ फुट मापाची एक मोठी bag त्यातून एकेक वस्तू काढून तो डिलिव्हरीची तयारी करत होता ... ती साधारण उचलून पहिली तर सुमारे १२-१३ किलो सहज असावी ...