लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स
"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का...
मिसळपाव