Skip to main content

अथ: केस कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 18/02/2015 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही. काही पुरुष विग घालतात, पण विग डोक्यावरून पडली तर, फजिती होते.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/02/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4 जम्मू श्रीनगर बस प्रवास

1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा... ‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा...

भूत... वर्त्तमान.... भवीष्य

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 18/02/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेला होउन जो.... भूत; होऊ घातला तो... भविष्य हातात काही न ज्यांच्या तेच भुत अन भविष्य.... वर्तमानाचा तो सागर उचंबळुन येई ग किनारी करंटया मनुष्याला परी नाही किम्मत तयाची नाही हातात जे जे ते ते हवे म्हणे माणूस म्हणुनच का ग त्याला वर्तमान आणि रंजिस?! --------

खुशबू (भाग २)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 18/02/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ? काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज …… -------------------------------- ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती.

आम्हाला फक्त विकास हवाय... !

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 18/02/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला.

सागरी सुका मेवा (लेखासहीत)

लेखक जागु यांनी बुधवार, 18/02/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यावर टोपली, हातात एक हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी, पायात कधी चप्पल नाहीतर अनवाणी, कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली आणि कानात मोठ्या गाठ्या प्रमाणे म्हणा की मोठ्या कोलंबीप्रमाणे असलेले कानातले, त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होलामुळे कानाच्या पाळीसकट लोंबणारे तिचे गाठी कानातले अशी रूप असलेली एक कोळीण आजी माझ्या आजीची मैत्रीण होती. महिना दोन महिन्याने तिची वारी आजीला भेटण्यासाठी आमच्या घरी असायचीच. उरणच्या करंजा गावातून ती आमच्या उरणच्या नागांव ह्या गावात जवळ जवळ दीड तास चालून यायची.

वनविहार - मिपा कट्टा - कॅमेरा नं २

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 18/02/2015 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍यापैकी अगोदर संयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ काढण्यास सोयीचे असते या हिशेबाने कट्टा फेम मुवि यानी कशेळे वनविहार कट्टा मिपाकरांसाठी खूप वेळ देऊन घोषित केला होता. त्यानुसार उत्साहात एक पाहिली यादी जाहीर झाली काहींच्या अचानक आलेल्या अडचणींमुळे त्यातून काही नावे गळाली. पण कट्टा पार पडला. एकमेकाना फोनाफोनी करता पुण्याहून चिंचवडमार्गे एकूण साडेनउ माणसे जाणार हे नक्की झाले. पण हे सर मुविना ( आपल्या मिपाचे सर रविद्र जडेजा )कळविण्यासाठी त्यांच्याशी नेटवर्क हे नेटवक्र झाल्याने संपर्क होईना. शेवटी चला तसेच जाउ पाहू या पुढे असे ठरले.

आनंदाचे डोही

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 18/02/2015 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
बाबु मोशाय सांगून गेलायं आनंद मरा नही.... आनंद मरते नही.... आनंद जिवंत असेल, अगदी भले आपल्या आसपासही असेल, पण आपल्याशी सतत लपाछपीचा खेळ कां खेळत असतो? आत्ता आपण त्याच्याबरोबर हसत खेळत होतो, आणि क्षणातच कुठे नाहीसा झाला? खरचं बरोबर असलेला तो आनंदच होता, की कोणी तोतया? आनंद कसा दिसतो, कुठे रहातो, काय खातो, आपण वेगळेवेगळे तर्क करीत असतो. तो ना समोरच्या आलिशान बंगल्यात रहातो... छे! त्या आलिशान बंगल्यात फ़क्त त्याची सावत्र भावंडे रहातात. ईर्षा आणि घमेंड.