Skip to main content

नाटक

लेखक पदकि यांनी शुक्रवार, 20/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचे माझ्या | जाले जे नाटक त्याचे हे फाटक | उघडितो होतो (आणि आहे)| तसा मी सावळा जनही बावळा | म्हणताती रूप-हीन मुख| नसे मी देखणा डोळ्याने चकणा/ थोडाफार ऐसे कैसे रूप| कॉर्पोरेटी न्यावे जनां न साहवे| माझी चिंता अरे जरा शर्ट| पॅंटीमघ्ये खोच कशी नाही बोच | तुला मुळी? केसही जरासे | बारीक कापावे तेलही लावावे | स्नानोत्तर पायी असू द्यावे| चामड्याचे बूट घ्यावयास सूट| पैसा देतो वगैरे इत्यादि | ठोकून ती मूर्ती थोडीफार कीर्ती | मिळविली कंपनीत झालो | थोडासा साहेब लटका रुबाब | दिनरात्री नोकर धावती | हुकुमात आज मनामाजी लाज | वाटतसे उचलली जर| माझी मीच बॅग वरिष्ठांना राग | मनामाजी असा

मृत्युषडाष्टक

लेखक नितीनचंद्र यांनी गुरुवार, 19/02/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही. यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले.

गाठोडं

लेखक निलरंजन यांनी गुरुवार, 19/02/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
अंथरूणावर पडताना जाणवते मला अपेक्षांचे ओझे तेवढेच जड झालेले चिंतेने भरलेले गाठोडे, चिंता असतात रोजच्या जगण्यातल्या. चिंता असतात न सुटलेल्या प्रश्नांच्या चिता राहून गेलेल्या महत्वाच्या कामाच्या, अपेक्षा असतात भविष्यातल्या प्रगतीच्या, अपेक्षा असतात स्वप्नपूर्तीच्या, अपेक्षा असतात उज्वल यशाच्या, आशा दरवेळेस असते की उदया या सार्या चिंता सुटतील स्वप्नातल्या वैभवावर प्रगतीचे इमले चढतील सुख आपल्या पुढ्यात पायघड्या घालतील वाटते देव दयावान होईल आणि चिंता माझ्या मिटतील लाॅटरीच्या तिकिटासारखे सर्व प्रश्न झटक्यात सुटतील पण असे काही होत नाही दिवस सुने जात नाही आजची कितीतरी कामे माझी उद्यावर जातात

रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण

लेखक सतीश कुडतरकर यांनी गुरुवार, 19/02/2015 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण सन २००७ साली गिरीविराज हायकर्सने पारंपारिक मार्गाने म्हणजेच रंगभूत सुळक्याचा मागील बाजूने माथा गाठला होता. पण या चढाई दरम्यान किरण काकांच्या मनात सुळक्याची सरळसोट ३५० फुटी धार मनात भरली होती. असे अवघड मार्ग सर करण्याचे सोडून पारंपारिक मार्गानेच बहुतेक ठिकाणी चढाई केली जाते. याला छेद द्यावा म्हणून त्याच वेळेस या एकसंध खडकाळ धारेवरूनच चढाई करावी अस काकांनी मनोमन ठरवलं. पण त्यासाठी २०१२ साल उजाडाव लागलं.

स्वाइन फ्लू

लेखक देवांग यांनी गुरुवार, 19/02/2015 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी... * स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात.

मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/02/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही.

शिकाम्बा-मशाम्बा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 19/02/2015 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही. त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं. पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत.

वनविहार -सिंहावलोकन क्यामेरा- मुलुंड ते कशेळे….

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 19/02/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणता म्हणता १५ फेब्रुवारी उजाडलाच …. दोनच गोष्टींसाठी ह्या दिवसाकडे डोळे लावून बसलो होतो…. एक म्हणजे म्याच आणि दुसरा मिपा महाकट्टा संमेलन ! दोन्हीपैकी एकच काहीतरी करता येण्यासारखे होते म्हणून मग कट्ट्याला पसंती दिली …. (म्याचचे समालोचन करणारे तिथेही असणार हे माहिती होतेच ) …. कट्ट्याचा धागा रोज पाहत असताना त्यावर येणारे प्रतिसाद वाचून कशेळेला मिपाकरांचा महामोर्चा वगैरे निघतो की काय अशीही शंका आली होती (परंतु ऐनवेळी मोर्चाचे रुपांतर भूमिगत चळवळीत झाले ! ). मी जाणार आहे असे जाहीर केल्यावर सौ.

पुन्हा पुन्हा बलात्कार

लेखक भिंगरी यांनी गुरुवार, 19/02/2015 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच. आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो. मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो. त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते. आज ४ दिवस झाले त्या माउलीने जेवण घेतले नाही. शुद्धिवर नसल्यामुळे दवाखान्यात अडमिट आहे.

खुशबू (भाग ३)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 19/02/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ कॅप्टन, मला मिळालेल्या इंस्त्रक्शननुसार, तुम्ही व तुमचे दाढीवाले रोमिओची युनिट आजपासून डिसमेंटल करण्यात येत आहे, तुम्ही आता १६ ग्रेनेडीअर च नेतृत्व करायचं आहे, तुमचे दाढीवाले रोमिओज, G (घातक) प्लाटून म्हणून ग्रेनेडीअरस मधे विलीन होतील.