Skip to main content

मराठी भाषा दिनानिमित्त - रच्याकने

लेखक अमित खोजे यांनी रविवार, 01/03/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांपासून मनामध्ये हा प्रश्न पडला होता शेवटी म्हटले कि हा लेख लिहायला मराठी भाषा दिवसापेक्षा अजून चांगला मुहूर्त सापडू शकत नाही. काल लेख टाकायला आलो तर मिपा बंद. म्हटले असेल काहीतरी दुरुस्तीचे काम. आत्ता उघडून बघितले तर कुसुमाग्रजांचा फोटो. वाह! क्या बात है! सुंदर आलंय हे चित्र अगदी. मिसळपाव संस्थळावरील या चित्र फलकाच्या कलाकाराला आमचा मुजरा. अगदी व्यावसायिक पद्धतीने काढलेले दिसत आहे. त्यातच वेल्लाभट यांचा मराठी भाषेवरील उत्कृष्ट लेख वाचला. आणि मग आपला प्रश्न विचारायला अजूनच स्फुरण चढले. त्यातच त्यांच्या लेखाचे नावही हळूच ढापले.

झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक शरद यांनी रविवार, 01/03/2015 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्‍हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली.

मराठी पुस्तकांवर २०-२५ टक्के सवलत

लेखक शिवमुद्रा यांनी रविवार, 01/03/2015 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
http://adf.ly/158NYw मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील नामवंत प्रकाशकांच्या सहकार्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ने सादर केलेल्या सवलतीतील पुस्तक खरेदी उपक्रमास वाचनप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला असून, ही सवलत आज, शनिवार व उद्या, रविवार असे आणखी दोन दिवस सुरू असेल. या बातमीचे कात्रण आणणाऱ्यास ही सवलत मिळेल. मॅजेस्टिक, राजहंस, मौज, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, पद्मगंधा, लोकवाङ्‍मयगृह या प्रकाशन संस्थांच्या मराठी पुस्तकांच्या खरेदीवर दादर आणि ठाणे येथील मॅजेस्टिकच्या ग्रंथदालनात २५ टक्के सवलत मिळेल.

लॅबररी लव 1

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 28/02/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
'आजी मी बाहेर जाणार आहे,' मी माझ्या आजीला मोठ्या आवाजात ओरडून सांगते व   जिन्यावरून खाली जाताना काल मी लॅबररीतुन वाचण्यासाठी काही पुस्तके घेतली होती त्या पुस्तकाचा बंडल हातात घेते. 'हो नक्कीच डीयर,' ती बहुतेक घरात किचनमधून बोलली आसेल,  पण तीने मला कोठे चाललीस म्हणून विचारले नाही, कारण तीला माहीत आहे मी जाणार तर एकाच ठीकाणी ते म्हणजे लॅबररी. 'तु ठीक आहेस ना?,' आजी मला नेहमी विचारते, खरचं ती माझी खुपच काळजी घेते. 'हो आजी मी छान आहे,' 'बरं का बाहेर जाण्यास वेळ करु नकोस, तुझ्यासाठी मी टोमॅटोचे सुप बनवले आहे, ' तीला माझ्या आवडीचे पदार्थाच करायला खुप आवडते.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संग - भाग 5

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 28/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.

भाग 5

फुकट फजिती!

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मेघांची तलम झालरही होती.

आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 28/02/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे. आजपर्यंत पुण्यात खासगी असे एकच आयुर्वेद रुग्नालय आहे,बाकी जी आहेत ती वेगवेगळ्या महाविद्यालयांना सल्लग्न आहेत. ज्यांच्या पिढ्यान पिढ्या आयुर्वेदात गेल्या आहेत अश्या लोकांनीही आजपर्यंत हा विचार केला नाही पण अंगात थोडे सुलेमानी किडे असल्याने हे धाडस करतो आहे,तरी यात काय काय सुधारणा करता येतिल ?

निष्पर्ण

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 28/02/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले, जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले… आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल, कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल, पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही, का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही, वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले, आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले… एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे, साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे, मी ज्यांची साथ केली ते मला सोडून

अर्थसंकल्प २०१५

लेखक विकास यांनी शनिवार, 28/02/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प २०१५ आज संसदेत सादर करण्यात आला. त्यावर विशेष चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे. खाली सरकारी माहिती चर्चा सुरू करण्यासाठी चिकटवत आहे. where the rupee comes from, and where it goes to: a quick glance where the rupee comes from, and where it goes to: a quick glance अर्थसंकल्प कसा वाटला? प्रत्यक्ष (तात्काळ) आणि अप्रत्यक्ष (दूरगामी) फायदे आहेत का? असले तर काय? तेच तोट्यांबाबत. सवंग घोषणा किती आहेत असे वाटले? वगैरे वगैरे...

अवेळी असे मेघ दाटून येता.....

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 28/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अवेळी असे मेघ दाटून येता जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे. जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे..... कितीदा पडावे, कितीदा वहावे धडे अनुभवांचे किती साठवावे. किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा किती चातकाने मना समजवावे .... पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... अवेळी असे मेघ दाटून येता मनाच्या नभाला जरा आवरावे....

नये

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 28/02/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
इतके गप्पिष्ट असू नये, माझ्यापाशी बसू नये हातामध्ये हात घेउनी , नशीब माझे पाहू नये इतके वेल्हाळ असू नये, माझ्यादारी येऊ नये नजरेमध्ये नजर मिसळून, ठाव माझा घेऊ नये इतके जिवलग असू नये, माझ्याठायी वसू नये श्वासामध्ये श्वास रोधून, अंत माझा पाहू नये इतके मैत्र असू नये, माझ्याइथे उरू नये आज आहे, उद्या नाही, नाते माझे जोखू नये !