Skip to main content

माणूस ..... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 22/03/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो. तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते. परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते. तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा. त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले, ‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’ त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे! एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय . पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.

भृगु संहिता फल आदेशाच्या शोधात... भटकंती?

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 22/03/2015 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
भृगु संहिता फल पत्रांच्या शोधात... मित्रांनो, आज या नववर्षाच्या सुरवातीला नाडी ग्रंथ भविष्य विषयावर पुढे शोध कार्य चालू ठेवण्याच्या निमित्ताने भृगु संहिता फल आदेश नेपाळमधे संग्रहित केले असल्याचे ऐकून होतो त्या वर अभ्यास दौरा करायला मी व जळगावच्या विवेक चौधरींनी काठमांडूची यात्रा करायला गोवा एक्सप्रेस ने जात आहोत. त्यानंतर मेरठ, सहारनपूर, गुरू वालिया, प्रताप गढ, लखनौ येथील भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट वार्ता, फलादेश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत.

मी उपवर तरुण असतो तर

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 22/03/2015 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच. कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे.

सोमनाथपुरा

लेखक पॉइंट ब्लँक यांनी रविवार, 22/03/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे. कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

लेखक आतिवास यांनी रविवार, 22/03/2015 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ,, , , (विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.) भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला

बोलाचीच बिर्याणी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 22/03/2015 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले. इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे. त्याने जे केले त्याला पुरेशी प्रसिद्धी दिली असती तर ते पुरले असते. त्याला खोट्या बिर्याणीची फोडणी द्यायची काय गरज आहे? मला वाटते असा खोटारडेपणा करणे अगदी कसाबबद्दल असले तरी खोडसाळपणाचे आहे. ह्या बिर्याणीमुळे त्या वेळच्या सरकारच्या अब्रूचा फालुदा झाला त्याला जबाबदार कोण?

संस्कृत सुभाषिते

लेखक शरद यांनी शनिवार, 21/03/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो. मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ?

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 21/03/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.

आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४

1

समापन

या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो. लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो. 1. कोणताही पुर्वाग्रह नको. 2.

देखा एक ख्वाब तो

लेखक कहर यांनी शनिवार, 21/03/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी ३ लाच बाहेर पडलो. कोणालाच न सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते.