Skip to main content

भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/04/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने ह्या कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत. नवीनतम धोरण TRAI ने स्विकारल्या भारतातील Net neutrality कशी

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो.. पुढे चालू... ================================== अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात.

काळरात्र....!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 11/04/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासून पहात होतो मी तिला लोक सांगायचे कि ती वेडी आहे खायला काळ आणि भुईला भार अशी एक बिन अकलेची घोडी आहे मेंदूने असहकार पुकारला असला तरी शरिराने आपल कर्तव्य बजावलं होतं तिच्या निरागस मनाला न जुमानता तिला ज्वानीच्या बाजारात आणलं होतं एका ओल्या काळरात्री गावाच्या वेशीवर ती भांबावलेली सैरभैर रडवेली दिसली मला पहाताच " आई गर्दीत हरवली" निरागसपणे सांगुन दात विचकून हसली अश्याच संधीच्या शोधात मी देखील होतो म्हटलं मनात की शिकार आयतीच गवसली क्षणातच तिच्या गोबर्‍या गालावर वळ उमटले मुस्काट दाबून तिला झुडूपांत फरफटवली पाऊस आता बेभान कोसळत होता मला अडवायला जिवाचे रान करत होता त्याच्या राज्यातले हे
काव्यरस

गेम ड्रोम -१

लेखक अद्द्या यांनी शनिवार, 11/04/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बारावी निकाल लागला . .खरं म्हणजे परत एकदा निकाल लागला . . मार्च ला ३ विषय . . जून ला साला १ विषय . . . " च्यायला हे केमेस्ट्री काय सुटत नाय अद्दया " . बाजूला थांबलेला माझा मित्र म्हणाला . . काही न बोलता नोटीस बोर्ड समोरून बाजूला झालो . मित्र हि होताच बाजूला . तिथून जे सुटलो ते थेट त्याच्या घरीच. . म्हणजे अगदीच काही ढ प्रकारात नवतो . बाकी विषयात होते ७५-८० . . पण केमेस्ट्री . . आयुष्यात लागलेली सर्वात मोठी पनवती होती च्यायला . विषय वाईट नाही तो . मजेदार आहे . पण काही केल्या डोक्यात घुसाय्चाच नाही . एक तर घोकंपट्टी कधी जमली नाही . प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करायची मस्ती होती .

सुभाषबाबू सत्य ..पाळत ...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 11/04/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ? इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ? त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ? सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ? काय खरे काय खोटे ?

"सेफ, अ‍ॅण्ड फोर" - रिची बेनॉ

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 11/04/2015 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्‍या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्‍याच्या डोक्यात येणार्‍या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"!

'महिला दिन' मोझाम्बिकचा: भाग १

लेखक आतिवास यांनी शनिवार, 11/04/2015 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
दर दोन-चार दिवसांनी कोणतातरी आंतरराष्ट्रीय दिन असतो असं मला हल्ली वाटायला लागलं आहे. मागच्या आठवड्यात कधीतरी सेलिया मला म्हणाली, “आम्ही सगळ्या एकसारखा कापुलाना शिवणार आहोत. तू पण घेशील का?” ‘कापुलाना’ हे इथल्या स्त्रियांचं पारंपरिक वस्त्र. मुळात ते काहीसं आपल्याकडच्या लुंगीसारखं असतं. पण आता बदलत्या काळानुसार विविध प्रकारचे कापुलाना आले. हा एक प्रकार (निळा ड्रेस) k1 हा दुसरा प्रकार.