स्पेन...समाप्त.
सेविलाच्या अनेक पर्यटन-स्थानांमधे प्रमुख दोन आकर्षणे आहेत. त्यातील एक म्हणजे Royal Alcazar Palace. साधारण बाराव्या शतकात बांधल्या गेलेला हा पॅलेस इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना म्हणून गणल्या जातो. हा राजवाडा युरोप मधील राहत्या राजवाड्यांपैकी सर्वात प्राचीन आहे. स्पॅनिश राजघराण्याचं सेविला मधील हे निवासस्थान...अर्थातच काही भाग, बाकीचा भाग आम जनतेसाठी खुला आहे. ही शाही इमारत आणि बाग म्हणतात की अप्रतिम सुरेख आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. वेळेच्या अभावी खरंतर म्हणायला नको कारण तसा वेळ होता. पण म्हणतात ना की too much of a good thing is bad!
मिसळपाव