शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?)
आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.
जनातलं, मनातलं.
तो...
जगं जिंकायची इच्छा मनात होती तेंव्हा कधी स्वतःला गमावायची वेळ येउ शकते याची पुसटशी शंकाही त्यावेळी आली न्हवती. तो उन्मादच वेगळा होता. मनात येइल ते करु जाण्याचा. याच आत्मविश्वासापोटी तर त्याने अख्खे जग जिंकायचा अघोरी प्रयत्न सुरु केला होता. त्याच्या व्यक्तीमत्वावर, शौर्यावर, हुशारीवर, महत्वाकांक्षेवर भाळुन अनेकांनी त्याला नुसती साथच न्हवे तर त्याच्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुतीही दिली होती. अजुनही कित्येक तयार होते त्याच्या एका शब्दावर सर्वस्व पणाला लावायला. स्वतःपेक्षा तत्व मोठे हा धडा तर त्यानेच सर्वांना शिकवला होता. त्याआधारेच आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झालेली होती.
कोकण वारी - २०१५
नमस्कारम, मागच्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कोकण दौरा झाला, यावर्षी उकाडा प्रचंड असल्याने ठरलेल्या प्लान मध्ये बरेच बदल झाले.मालवण /तारकर्ली करणार होतो, पण आयत्यावेळी ते रद्द केले. पर्यायी मार्ग मुंबई-पनवेल-टोळफाटा-मंडणगड-दापोली-दाभोळ बंदर –धोपावे(जेट्टी )- गुहागर(मुक्काम)- हेदवी-तवसाळ(जेट्टी)-जयगड-रीळ-मालगुंड-गणपतीपुळे- आरेवारे- रत्नागिरी- पावस –आडिवरे असा ठरला.
सकाळी नेहमीप्रमाणे ५ लाच सगळी तयारी करून बाहेर पडलो. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. पनवेल सोडून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो, रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीही पाहिलेली नव्हती, जी परिस्थिती २ वर्षांपूर्वी होती, तीच आजही होती.
चर्चा नको? वाद हवा??
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते.
शब्द झाले मोती...
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?
बघु सुरुवात करतो आहे..
एक थरारक प्रवास "किल्ले रांगणा" चा
ओळख किल्ल्याची
स्वराज्याच्या गडकोठाची सफर करण्याची मला खूप आवड आहे.. त्यात छ. शिवाजी राजांचा भक्त असल्याकारणाने त्यांचा इतिहास जवळून पाहण्याचा मोह तर खूपच. मला गडांना भेट द्यायला जास्त वेळ भेटत नाही. तरीही मी वेळ काडून गड किल्ल्यांना भेट देतो. आज पहायची इच्छा झाली तो इतिहासाचा साक्षीदार रांगणा किल्ला या किल्ल्याला पसिद्धगड असेही म्हणतात. समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला. बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक
सुरकतलेल्या चेहर्यावरी तुझाच कयास
उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेल्या पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!
आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण
रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव
हरवलं आता भान.. अंधारलं जग
मिठीत तुझ्या विसावलं वेडं स्वप्नपान
------------- शब्दमेघ
काव्यरस
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
काव्यरस
फाटक्या
३-४ दिवस मस्त सुट्टी जुळून आली होती . . आणि पुढे आम्ही टाकली होती . . गेले ८ महिने निस्ते काम काम काम याच्यातच घालवले होते . अगदी रविवारी पण काहीना काही काम काढून एक्स्ट्रा पैसा मिळवण्याच्या मागे होतो . पण आता कंटाळा नुसता भरून राहिला होता सगळी कडे . सो . बेंगलोर ला जायचं ठरलं . कॉलेज ची १-२ कार्टी होतीच तिथे . त्यांना फोनाफोनी झाली . आणि २ दिवस बेंगलोर -मैसूर ट्रीप . आणि एक दिवस त्यांच्या रूम वर बसून ओल्ड मंक आणि तंदुरी चिकन ची आराधना . असा फक्कड प्रोग्राम ठरला होता . . त्याप्रमाणे बुधवार संध्याकाळी मी न आकीब बस मध्ये चढलो होतो .
हा माझा शाळेपासूनचा मित्र . .
मिसळपाव