Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल. तर... वाचकांना ही विनंती आहे की... कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका. धन्यवाद.

सरदारी बेगम -एक संगीतिक सुन्न अनुभव

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
सरदारी बेगम बंगलोर मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझा मित्र , सतीश , राहत आहे. काल त्याला भेटायला गेलो होतो. बंगलोरचे भयाण ट्राफिकमुळे दोन तास लागले. सतीशला बराच वेळ रिसेप्शनमध्ये ताटकळत बसावे लागले. वर्षभराने भेटत होतो त्यामुळे गप्पा लगेच रंगल्या. आमच्या अनेक आवडीनिवडी समान आहेत आणि म्हणून मैत्री २० वर्षे टिकून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मात्र त्याच्या (कु)चेष्टेचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंद संगीत सुरु होते. गिटार , सतार आणि तबला ह्यांचे फ्युजन ( बहुतेक प्रेम जोसुआचे) ऐकत त्याने आपल्या भारतीय संगीताची ( खरेतर माझी ) मापे काढायला सुरवात केली.

माझे व्यायामाचे फंडे -१ ,

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 03/08/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
शरीर माध्यम खलु धर्म साधनम ! असे एक संस्कृत मधील सुभाषित आहे. माणसाचे शरीर उत्तम आसेल तर ,त्याचे भवितव्य ही उज्वल असते य़ा वरील उक्ती प्रमाणे ,रोज थोडातरी व्यायाम करावा आसे मी रोज ठरवतो . रात्री झोपताना नित्यनियमाने गजर लावणे ,सर्व कपडे ,बूट याची योग्य व्यवस्था करून मगच झोपतो . मात्र नेमका गजर वाझला की माझे नियोजन पूर्ण पणे बदलून जाते .त्या उबदार पांघरुणात असे वाटते कि "जाऊ दे यार !

[शतशब्दकथा स्पर्धा] मोलाची माया

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 03/08/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
“अग आटोप!” “झालंच! दीपच्या आवडीचा शिरा भाजतेय.” दीप यायच्या आधीच उरकले पाहिजे. तान्हा असतांना मुलाच्या विनंतीमुळे सपोर्टसाठी त्यांच्या घरीच रहायचो. सासूसासऱ्यांचे रहाणे आवडत नसल्याचे सुनेने आडवळणांने सुचविले. आधी- “तुम्हाला त्रास होतो, सगळ्यांचे करावे लागते”, मग- “आजकाल प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते!” स्वत:च्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. कामावर जाण्याआधी मुलगा दीपला पोहचवतो, संध्याकाळी घेवून जातो! बरेच आहे! आपण स्वतंत्र, नातवाचा सहवास देखील! दिप तर आपल्या लोभासाठी आसुसलेला असतो!. येणाऱ्या चैतन्याच्या झुळुकीने ती मोहरली. एवढ्यात फोन....

[शतशब्दकथा स्पर्धा] स्वाभिमानी मुलगा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/08/2015 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा? फारेनला आहे आजकल. कुठे दुबई ला? आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे. काय करतो तिथे? मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे. अस होय, मग लग्न वैगरेह तिथेच केले असेल त्याने? छे हो, स्वाभिमानी मुलगा आहे, म्हणतो करेल तर मराठी मुलीशीच. आता साहेब तुम्हीच सांगा, तिथे ओटावाच्या जेल मध्ये मराठी मुलगी कुठे मिळणार. आ!!!

माया (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी शनिवार, 01/08/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला .

[शतशब्दकथा स्पर्धा] पदार्पण

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 01/08/2015 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
संपलाचकी खेळ आता, शेवटचीच विकेट, शेवटचे दोन चेंडू, चारच धावा जिंकायला.... बॉलर शॉर्ट टाकणार अशी शंका येऊनच फलंदाजाने मारलेला हुक हुकलाच!

जडण घडण - २५

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 01/08/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
जडण-घडण -२५ ...कसे आहात. आज कसं काय बोलावंसं वाटलं... मला रोज वाटतं. इथून ये-जा करावी लागतेच मला. मग... जाऊ दे. तू कशी आहेस. मी इथे उभा आहे, आपल्या बस स्टॉपवर... मला छान हसू आलं. अरे वा, लवकर आलात. मग बराच वेळ माझी चौकशी. कशी आहेस, काय करतेस, घरातलं सगळं आणि बरंच काही. खरं तर मी कार्यालयात इतका वेळ कधीच फोनवर नसते. तो दिवस मात्र अपवाद ठरला. केवढं विचारायचं, बोलायचं आणि सांगायचं राहिलं होतं त्याचं. मी क्वचित बोलत होते. मग म्हटलं, एका दिवसातच बोलायचंय का सगळं. बरं. मग पुन्हा बोलायला नको. संपवून घ्या आजच सगळं बोलणं. अग ए...

द स्केअरक्रो - भाग ‍१५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 01/08/2015 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १४ द स्केअरक्रो भाग १५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसून अगदी लक्षपूर्वक सिक्युरिटी स्क्रीनकडे पाहात होता. दोघेजण जिनिव्हाला त्यांचे बॅजेस दाखवत होते. त्याने बॅजेसवर झूम इन करून ते कोणाकडून आलेले आहेत हे पाहण्याआधीच दोघांनीही बॅजेस परत खिशात ठेवून दिल्यामुळे ते नक्की कोणत्या एजन्सीकडून आलेले आहेत ते कार्व्हरला समजू शकलं नाही. जिनिव्हाने तिच्यासमोरचा इंटरकॉम उचलला आणि तीन नंबर्स हलकेच दाबले. ती मॅकगिनिसच्या ऑफिसमध्ये फोन करते आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

सोडल्य दह्यात मिश्या ( करून दाखवले )

लेखक पाटीलअमित यांनी शनिवार, 01/08/2015 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
prequel 1 मुल प्रेना मोकलाया दाहि दिश्या तसेच हे आव्हान ============================================== prequel 2 पण ह्या लेखाचा जबाबदार आहे समाज ,तो समाज जो कंपू बाजी करतो तो समाज जबाबदार .एक माणूस मिपाबालक म्हणून परवेश करतो एका नवीन घरात ,पण मिळते काय तर धिक्कार तिरस्कार वाटले होते लहान मुलाला समजून घेतील वडीलधारे पण इथे मिळाले पार बायको सारखे उणे दुने काढणारे असो ====================================== निस्त्ले केसं ते मला खून वीत आहे स्वह