[शतशब्दकथा स्पर्धा] टॅक्स
"मिस्टर उन्निथन, काय प्रकार आहे हा?"
"इंन्स्पेक्टर, मी काही चुकीचे केले नाही , तुमचाच नियम फॉलो केलाय."
"मिस्टर शर्मा, यांना नियम समजवा जरा, शेड्युल दाखवा"
"साहेब, मी सरळ बिझिनेस केलाय, यात एका पैशाचीही चोरी नाही.
"टॅक्स कमी भरलात की !"
"टॅक्स म्हणून जवळपास साडेसात लाख रुपये भरलेत मी, "
"एकूण टॅक्स एकोणीस लाख असतांना तुम्ही ७.५ लाख रुपये काय म्हणताय ? मला कारवाई करावी लागेल"
"मी नियमानुसारच टॅक्स भरलाय, तुम्ही एका केरळी माणसाला उगीच त्रास देताय"
"हेअर ऑईलवर १२.५% व्हॅट लागतो, तुम्ही ५% हिशोबाने पैसे भरलेयत."
.
.
.
.
"सर, आमच्यासाठी ते "खाद्यतेल" आहे.
कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई
नमस्कार मंडळी
पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा.
आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढत
भाषेरी कुंपण
लेख दुसरा...
हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन...
प्रतिक्रियांची वाट पाहत आहे...
........भाषेरी कुंपण.........
आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय.
पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय.
मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय.
माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही.
अन
वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही.
(मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग.
मी यशस्वी होईल??
तिसऱ्याची आमटी.
मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचा निसर्ग स्त्रोत म्हणजे कवचमासे (शेलफिश);कोलंबी,शेवंडी,खेकडे किंवा कुर्ल्या,कालवे,खुबे,शिनाण्या,तिसऱ्या,एक ना दोन.तिसऱ्यानाच,शिंपल्या,शिवल्या,मुळे असे म्हणतात.
आमचीबी चालुगिरी…
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा….
आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा..
त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.
[शतशब्दकथा स्पर्धा] सुगंधी हातरूमाल
"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला.
[शतशब्दकथा स्पर्धा]: प्रतिबिंब
अनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले.
आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती,
"अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन !
त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. पलंगावर इतर कोणीही नव्हते.
आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही वळुन आरशाकडे पाहायला लागले होते.
[शतशब्दकथा स्पर्धा] डिझाईन
आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली.
तो मस्तपैकी हसला..
~
"बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.."
"....."
"घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल."
"फुटबॉल खेळेल?"
दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले..
~
डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही.
ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती..
तो... डॉक्टरांमागे पळत होता..
~
"ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले..
नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला.
तो गप्पच होता.. दोन दिवस..
~
"आई...
माझे व्यायामाचे फ़ंडे- २
माझे व्यायामाचे फंडे - २
(कृपया वाचकांनी लेखाच्या तांत्रिक बाबींकडे न पाहता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा, ही विनंती आहे.)
आमच्याच शहरातील महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ही योगासने शिकवली जात होती. योगासनासारख्या आरोग्याशी निगडित गोष्टीसाठी नेमका महानगरपालिकेचा हॉल कसा काय मिळतो कुणास ठाऊक? त्यात भरीस भर म्हणून नेमका हा योगासनाचा वर्ग भाजी मंडईत होता. तिथे असणारी स्वच्छतागॄहे खूपच अस्वच्छ होती. योगासने करताना कधी कांद्याचा तर कधी ढब्बू मिरचीचा, कधी आंब्याचा तर कधी फणसाचा.. सीझनप्रमाणे वेगवेगळे वास येत होते.
मिसळपाव