Skip to main content

माया -३ (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 13/08/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
माया - १ माया -२ सगळ्या घरात एक उदासपणा पसरला होता . ते घर आता केविलवाणं दिसू लागलं . त्या घरातले स्मित गेले . काव्य गेले . बडबड थांबली .राजीव अगोदरच घुम्या . ती भयाण शांतता सावित्री बाईंच्या अंगावर येवू लागली . मध्ये मध्ये येणारा पोरीच्या रडण्याचाच काय तो आवाज .त्या लेकराला बराच वेळ आई ने आपल्याला घेतलं नाही हे जाणवत असावं . राजीवला काहीतरी मनात टोचत होतं. ह्या पोरीचा जन्म झाला आणि चंद्रा आपल्याला , ह्या घराला सोडून गेली असं काहीसं त्याला वाटत होतं .

[शतशब्दकथास्पर्धा] भेट

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 13/08/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती. पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली. ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?” त्यालाही ओळख वाढवायचीच होती.

असमाधानाची

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 13/08/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक भरलेली 'शव'वाहिका एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते .........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी?? पानसरेंच्या छातीतली गोळी दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते, ..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती. नेमाडेंच्या दौतीतली शाई कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते .........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी??? कलामांची मुठमाती याकूबच्या मुठमातीला म्हणते .........मला कालच 'पालवी' फुटली, तू अजुन कोरडीच कशी?? गझलेची कैफियत कवितेच्या दुःखाला म्हणते .........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी??? माझी अ-स्वस्थता या जगाच्या स्वस्थतेला म्हणते .........असमाधानाची -तुझी ग 'व्याख्या' कोणती?
काव्यरस

माझी आवडती/नावडती पुस्तके: विज्ञानकथा, गूढकथा, रहस्यकथा

लेखक पुस्तकमित्र यांनी गुरुवार, 13/08/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आता पर्यंत या मालिकेत कथा, कविता, आत्मकथा, विनोद अशी आवडती-नावडती पुस्तके आपण पाहिली.

[शतशब्दकथास्पर्धा] - डील

लेखक अंतु बर्वा यांनी गुरुवार, 13/08/2015 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन हलली. "हितेसभाय!" त्याची तंद्री भंगली. "अरे दोशीसाब!" गप्पांवरुन दोघे बिजनेसमन असावेत. "क्या बताउ, धंदेकी लगी पडी है, सोचता हुं थानावाला दुकान बेच दुं" "अगर सचमें बेचना चाहते हो तो मै ले लेता हुं" "सच में? देखो दुकान तो नब्बे तक जा सकता है लेकीन तुम पिचासी दे दो" "मेरी हालात भी तुमसे अलग नही है, साठ-पैंसठकी बात होती तो सोचता." "मेरा कर्जाही साठका है. मेरे लिये भी तो कुछ बचना चाहिये ना?" "यार, तु दोस्त है इस्लिये सत्तर. इससे ज्यादा नही हो पायेगा" पहिल्याचं स्टेशन आलं…… इकडे फोनवर, "मगनसेठ, एक मस्त डील है, एक खोका तो पक्का..."

कोडी kodi प्लेयर

लेखक अलक निरन्जन यांनी गुरुवार, 13/08/2015 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच गूगल महाराजांनी एक मस्त अ‍ॅप्लिकेशन शोधून दिले. कोड़ी प्लेयर. हा प्लेयर एकदा इन्स्टॉल करा आणि काही अ‍ॅड ऑन इन्स्टॉल करा की स्काय इझ द लिमिट. काही अ‍ॅड ऑनची नावे सुरुवात करायला. Genesis / Icefilms सगळे लेटेस्ट हॉलीवुड बॉलीवुड मूव्हीज / मालिका तुमच्या एका क्लिकवर, तेबी बेस्ट क्वालिटी. तू नळीवर सगळ्या सूचना ढिगानी उपलब्ध. काही वैशिष्ट्ये 1. टॉरेंटची गरज नाही 2. डाउनलोड फॅसिलिटी उपलब्ध 3. बफर स्पीड एकदम मस्त भारतामध्ये चालेल की नाही याबद्दल साशंक, कारण बर्‍याच साइट्स ब्लॉक असतील कदाचित्, पण एकदा प्रयत्न करू शकता.

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 12/08/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात.... हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों. ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान.

MIDC

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 12/08/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो. अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो. "शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?" एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो- ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी. मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल.

मसाण

लेखक कोमल यांनी बुधवार, 12/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
कहानी शुरू होती है एक पोर्न से। देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.

(स्पर्धेसाठी नाही) क्लोज

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 12/08/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय? होय सर. तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद. होय सर. चला सुटा. +++++++++++++++++++++ उचल उचल भाड्याला. भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा. आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला. +++++++++++++++++++++ भाडखाऊ कुठं पळतो बे? न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की. कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट. व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला. तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज? साह्येब तिर्री सत्ती. उभा राहा भेनचोद आता.