Skip to main content

पॉडकास्टिंग म्हणजे काय?

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 13/10/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
podcast पॉडकास्टिंग म्हणजे काय? आजकाल बरेचसे ब्लॉग पॉडकास्ट स्वरुपात असतात? पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे? पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?

जीव ढोलीला टांगला

लेखक जागु यांनी मंगळवार, 13/10/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घराबाहेरच्या आवारात ५-६ ढोली असलेले आंब्याचे पुरातन झाड आहे. खंड्या, हळद्या, कोकिळा, कावळे, हॉर्नबिल यासारखे अनेक पक्षी सकाळची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला, तसेच निवांत व्हायला ह्या झाडावर बागडत असतात. तसं पाहील तर ह्या झाडाला साळुंखी पक्षांची वसाहत म्हणू शकतो. कारण झाडावरच्या ढोलीमध्ये साळुंखी पक्षांची कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असतात. हे पक्षी इतरत्र वावरतानाही जोडीने किंवा घोळक्याने दिसतात. क्वचित एखादा भरकटून किंवा भांडून-रागावून एकटा फिरताना दिसतो. माझ्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या मूडनुसार ह्या पक्षांच्या आवाजात चढ-उतार असतो.

नटरंग

लेखक एच्टूओ यांनी मंगळवार, 13/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नटराजा तुझी सोडून मी कधीच दुसऱ्या कशाची  उपासना केली नाही.. पण माझ्या प्राक्तनात आले स्मशानवत बैरागी भोग आणि टाळ्या घेण्याच्या मस्तीची शकले उडून दूरवर जाऊन पडली.. भयावेगात मी जाळून टाकल्या उर्मी आविष्काराच्या आणि ती राख सावडत अश्रू ढाळत बसतो सध्या.. तुझ्या अधिष्ठानाबद्दल कधीच शंका नव्हती मनात माझ्या पण गलितगात्रतेच्या विचारांची धार फोडत गेली माझा निर्धार आणि मी थंडपणे बंद केल्या तुझ्या जाणिवांच्या आकर्षक वाटा तुझ्यापेक्षा मोठे तुझे वेड-पण चौथ्या भिंतीपलिकडे बसलेल्या भेसूर दुःस्वप्नांना मी घाबरतो.. आता रिकाम्या हातांमध्ये बांधून मणाच्या वजनाचे दगड, खुरडतो आहे ठराविक चाकोरीत.. हे
काव्यरस

असेही मार्केटिंग

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 13/10/2015 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा काहीतरी विकणारा एक पोरगा दारावर आला. म्हणाला आमच्याकडे एक स्कीम आहे. अमुक इतके पैसे भरायचे. तुम्हाला हा प्लॅस्टिक जार मिळेल. तो तुम्ही फ्रीजमधेही ठेवू शकता आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमधेही ठेवू शकता. याचबरोबर पुढील २ वर्षे आमचा पेपरही मिळेल. त्याच्या रद्दीचेही पैसे तुम्हाला मिळतील. एकूण काय तुम्ही फायद्यात रहाल. सगळंच चक्रावून टाकणारं होतं... त्याला विचारलं नेमकी काय स्कीम आहे, काय विकतो आहेस. तेव्हा म्हणाला आम्ही एका दैनिकाचे प्रमोशन करतो आहे. मोठा प्रश्न पडला...

एकाकी

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 13/10/2015 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिथे थांबतोय जिथे थांबायचं न्हवत ठरवलं होत मागे वळून पहायचं न्हवत ती अंधार खोली पुन्हा उघडतोय मोडलेल्या फडताळात स्वताला शोधतोय सोफ्यावरली धूळ झटकून बसून क्षणभर डोळे मिटलेयत क्षणभरातच त्यांनीसुद्धा चुकांची चलचित्र पाहिलेयत जगाच्या वेगासोबत धावताना मागे खूप काही राहून गेलय कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई निरागस हसण विसरून गेलोय चव यशाची मिळवायला आजवर फक्त स्पर्धा केलीय दिखाउपणाच्या गर्दीसाठी आपल्यांची आहुती दिलीय आशा आहे तिरीप येईल उजेडाची अंधारात खांद्यावरती हात ठेऊन कुणी दावील त्यातून वाट अजूनही त्या अंधारात एकाकी पडलोय राहायचं आत्ता पुन्हा तिथे जिथे मी घडलोय
काव्यरस

भुत असते(च) (एक्सटेंडेड भयशशक प्रयत्न)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 12/10/2015 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आवरले एकदाचे, जरा लॉगिन करुया आता.. हम्म.... हॉटेलात आलेली माणसे, बॅटमॅन आहे ईए काका आहेत अरे वा जॅक हे आपले कॅप्टन जॅक स्पैरो आहेत... धागे कुठले बरं पेटले आहेत? 1 वर्षा नंतर...अर्र दादुमियां पेटले बहुदा! इकडे काय अहाहा मासे! सुरंगी तै न पोस्ट केलेली रेसिपी दिसते आहे... इथे आता कसले हिमालयात मासे!? असो!

टेडी-१ (भयकथा)

लेखक एकजटा अघोरी यांनी सोमवार, 12/10/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं. तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून.

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

आपण अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव जिल्ह्याचे आहात ? अहमदनगरयेथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते.