Skip to main content

आडवाटेवरची भटकंती : करमाळा आणि किल्ले परांडा

लेखक उल्लु यांनी सोमवार, 23/11/2015 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते.

देव म्हणावे कोणाला ?

लेखक मयुरMK यांनी सोमवार, 23/11/2015 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
पट्वुनी सांगा आम्हाला देव आम्ही म्हणावे कुणाला ? या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला भेटला कधी आहे का तो तुम्हाला....? देव दगडात असे की मुर्तीत वसे आहे का माहित, रूप तयाचे कसे ? उगीच का मग सजविता देव्हार्याला ? देव म्हणजे आहेत कुणी ते ? स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला .... असेल जर तो या जगती यावे तयाने या नजरेपुढती साद असे ही आमची त्या दैवाला असता मनी खरी भक्तिभावना करावी माणूसकीची आराधना जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .

लेखक मार्गी यांनी सोमवार, 23/11/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 23/11/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय.

अवधूत (भाग-५)

लेखक मांत्रिक यांनी सोमवार, 23/11/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अवधूत (भाग-५) थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाड् करुन एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहे-याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला. ***** आपण पाहिलं तो केवळ भास असावा, विजेच्या प्रकाशाने केलेला एक खेळ!

आला आला जिलबीवाला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 23/11/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस