जिलबीचं प्रमाण किती असावं ?
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693
नमस्कार मंडळी,
मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो.
पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो.
अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ.
आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय
इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्याच लोकांना माहिती आहे.
माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.
माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे
अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते.
माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे?
आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना?
जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ?
व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.
आपलं म्हणणं तीन पाच र्हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला
तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच.
ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.
लदाख सायकल ने : मढी ते गोंदला (भाग ४)
मग मी सचिन ला सांगितले कि आपण कैरियर काढून तार सरळ करू. परत कैरियर बसू मग ब्रेक चालू होईल. तुला पुढच्या ब्रेक वर अवलंबून रहायची आवश्यकता भासणार नाही. मग काय पंधरा मिनिटात त्याला ब्रेक ठीक करून दिला. सचिन म्हणाला तू नक्कीच इंजिनीअर आहेस. पण कोणता? मी म्हणालो एवढा ब्रेक ठीक करून दिला. आता मला नाही वाटत कि मला काय सांगायची गरज आहे ते. तरी सांगतो रेल्वे मध्ये मैक्यनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेपाच वाजता डोळे उघडले. काल दिवसभरात फक्त चौदाच किलोमीटर सायकल चालवली. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर निघायचं होतं. कारण नंतर रोहतांगला जाणाऱ्या गाड्यांचा तांडा अडचणी आणू शकतो.
चुकलेल्या पक्ष्याची गोष्ट..
माणूस चुकतो,
कधी अज्ञानाने चुकतो कधी अहंकाराने चुकतो, कधी गमतीत चुकतो तर कधी संगतीत चुकतो..
पण पक्षी, तेही चुकतात?
अशाच एका चुकलेल्या पक्षाची ही गोष्ट..
बार हेडेड गूस(पट्टकादंब) दर हिवाळ्यात मध्य आशिया किंवा त्यापलीकडून भारतात येतात. अत्यंत उंचावरून उडणारा हा देखणा पक्षी भारतात अनेक ठिकाणी आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील नेहमीची ठिकाणं म्हणजे भिगवण अन वीर जलाशय. विदर्भातही अनेक जलाशयात हा पक्षी उतरतो, साधारण 20-30 पक्षांचा एक असे अनेक थवे एकत्र असतात. अत्यंत जोमदार हालचालींसह जोरदार उड्डाण हे या पक्षाचे वैशिष्ट्य.
'सुका मेवा'
'सुका मेवा'
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष !
तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही,
वय साठ असून तरुणाला लाजवेल असे,
त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही!
राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात,
सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू.
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष !
तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही,
वय साठ असून तरुणाला लाजवेल असे,
त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही!
राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात,
सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू.एस्टी विश्व प्रदर्शन (२६ जानेवारी २०१६)
नमस्कार मिपाकर मंडळी,
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात विविध कार्यक्रम झाले असती नाही. तसाच एक अनोखा कार्यक्रम ठाण्याच्या खोपट बस डेपो मध्ये पार पडला. होय ह्या २६ जानेवारीच्या निमित्ताने एसटी विश्व प्रदर्शन भरवले गेले होते
एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती.
लदाख सायकल ने : गुलाबा ते मढी (भाग ३)
आज मी २१ किलोमीटर सायकल चालवली. मी आज एक चूक केली कि आजच दिल्ली वरून आलो होतो. मनाली मध्ये एक दिवस थांबायला पाहिजे होते. शरीर अनुकूल होण्यासाठी.सकाळी ५ वाजता अलार्म वाजला. मी उठलो ७ वाजता. तंबूच्या बाहेर येउन पाहिले तर एक गाय तंबूला चिकटूनच बसली होती. तंबू वरती शेन पण टाकले होते. मग मी ते धुवून घेतले. सामान बांधायला आणि ते सायकल वर चढवायला साडे आठ वाजले. नऊला तेथून निघालो. आज सामान बांधतानी एक गोष्ट वेगळी केली. तंबूला पुढे हैन्दलबारला घट्ट बांधून घेतले. त्यामुळे मागच्या चाकावरचे वजन कमी होऊन ते पुढच्या चाकावर आले. एकप्रकारे संतुलन साधलं गेलं.
मिसळपाव