Skip to main content

पोश्टरबॉईज

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 27/04/2016 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन" "जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही" "अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो." ("अरेरे इलेक्शन संपली आता. कन्नड नाटकाचे काम आलेय. पटकन ये") अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो. प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या. आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर.

जीव नांगरटीला आलाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 27/04/2016 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं घंघाळभर पाण्यानं भागंना आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण खळ्यावर आलू बांधावर फिरताना जवा सोग्यानं त्वांड पुसलं तवा म्होरल्या वावरात मला ऊसाचं कांडं रवताना उफाड्याचं सामान दिसलं आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत पायताणं तिकडं वळावली मग दगडं घेऊन गोफणीत जवारीवरं भिरकावली तसं म्होरलं वाफं सोडून सामान मधल्या आळ्याकडं आलं कंबरचा काष्टा काढून निऱ्या सावरत ताठ उभं झालं तोबरा भरुन म्या पानाचा इडा तिच्याम्होरं धरला "खाणार का इडा बिगर सुपारी, रंगणार मातुर नंबरी " काताचा खडा तोंडात टाकत म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली आन पिचकारी मारत म्हणलो "ऊस पाण्याला म्हाग " तसं सामान बां

बेधुंद (भाग ६ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 27/04/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्याच रात्री अजीत नित्याच्या रूम वर आला . आदित्य अन रवी पण बरोबर होते . आतून दरवाजा बंद केल्याने आत काय चाललं आहे हे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळायला मार्ग नव्हता . तसही भीतीने किंवा 'उगीच लफड्यात का पडायचे !' म्हणून आधीच बाकीचे विद्यार्थी आपापल्या रूममध्ये जाऊन बसले होते . रूम मध्ये नित्या , सुऱ्या , तात्या , चंद्या अन अक्षा हे सारे होते . अजीत खाली बसला होता अन त्याची मान त्याच्या गुडघ्यामध्ये होती . 'मेस' मध्ये पिसाळलेल्या जनावरासारखा अजित आता एखाद्या लहान मुलासारखा बसला होता . 'करीयर' पण काय भयानक गोष्ठ असतें नाही ! त्याच्या समोर सुऱ्या उभा होता .

एक संघ मैदानातला - भाग १

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 27/04/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांच्या फायनली परीक्षा आटपल्या प्रँक्टीसला पुन्हा सुरुवात झाली. परत एकदा सकाळ संध्याकाळच मैदान गजबजायला लागलं. ह्या सिजानला लागोपाठ ६ स्टेट लेवल खेळायच्या आहेत म्हणल्यावर पोरींनी पण जोर धरला होता. आम्हाला चांगलं रगडून घ्यायचा आप्पांचा प्लान होता. त्यातच अशी बातमी आली की नँशलचे सिलेक्टर ह्या टूर्नामेंट बघूनच १८ ची टीम सिलेक्ट करणार आणि मग कॅम्प लावून फायनल १२ काढणार. मग तर काय हाणा-मारीला ऊत आला. कबड्डी कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त वाटायला लागलं मैदान. एवढ्या दिवसानंतर उतरले होते. सगळं अंग दुखत होते. ३ महिन्याच्या गँप नंतर उतरल्यावर दुसरे काय होणार ? तंगड्या गळ्यात आल्या होत्या.

(तिफण गोफण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 27/04/2016 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुळाक्षरे १ येते ऊबळ अधून -मधून , खाजर्या धाग्याची , टाळ्याखाऊ हर्षाची , तुझ्या कुजक्या शेर्यांची , अन त्यावर केलेल्या फेर्याची … येते सणक अधून -मधून , खुसपटी लिखाणाची , निसटलेल्या अर्थाची , तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची , अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची …. येते सुरसुरी अधून -सुरसुरी रतीबाच्या गवळ्याची , लागो झकाझकींची , तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची , अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची …… ==================================== मुळाक्षरे २ ज्या लिखाणाला ऊंडारायचे(च) असते वाहवायचे अस

मि पा सदस्यांचे मत हवे आहे

लेखक shindebv यांनी बुधवार, 27/04/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे. हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी. खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 27/04/2016 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते!

सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 26/04/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

एक होती...

लेखक विजय पुरोहित यांनी मंगळवार, 26/04/2016 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
क्रींऽऽऽऽऽऽऽ गजराच्या कर्कश्श आवाजाने विवानला जाग आली. सकाळचे ७ वाजले होते. थोड्याशा अनिच्छेनेच तो आळोखेपिळोखे देत उठला. डोळे जरा कष्टानेच उघडल्यावर त्याने नजर आजूबाजूला फिरवली. ते कळाखाऊ घर बघून त्याला थोडंसं खिन्नच वाटलं. इथे आता सकाळी उठल्यावर चहा घेऊन आपली आई येणार नाही याची जाणीव त्याला अधिकच उदास करुन गेली. नुकतीच त्याची बदली या ग्रामीण आदिवासी भागात झालेली होती. इकडे येण्यास तसा तो नाराजच होता. परंतु येथे एक दोन वर्षे काम केल्यावर त्याला प्रमोशनसहित मुंबईत काम करण्याची संधी मिळेल, अशी साहेबांनी लालूच दाखवलेली होती. त्याला देखील ही ऑफर आवडलेली होती.