Skip to main content

गझल :- जंगलातले नियम इथे लावायचे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 02/06/2016 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
मानवांस खूळ लागले धावायचे जाणतील ते कधी, कुठे थांबायचे? घाबरून राहिले सदा काठावरी सांगतात आज ते, कसे पोहायचे! 'माज' जो समाज मिरवतो आभूषणे नम्र राहुनी तिथे कसे चालायचे? गोंधळात यारहो , तलत मी ऐकतो शान्तिदूत रोज रोज का शोधायचे? कोणत्या युगात ते मला नेतील रे? 'काम फ़क्त आपले खुळ्या चालायचे' टांगतील? जाळतील? भोसकतील का? ठरवतील आज ते, कसे मारायचे कोण तू? विचारतो कुणाला प्रश्न तू? तो म्हणेल 'नाच!' आणि तू नाचायचे शायरास त्या म्हणे मिळाली सूचना शेर आपले लिहायचे, फाडायचे काल बोलला कुणीतरी 'स्वामी' पुन्हा जंगलातले नियम इथे लावायचे - स्वामी संकेतानंद

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - ७

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 01/06/2016 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग सातवा - आज सकाळी हाइड पार्क मध्ये गेले. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या पार्कला बरेच प्रवेशद्वार आहेत. आज ठरवलं वेगळा रस्ता explor करूया. या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेले आणि समोर मस्त तळे आणि कारंजी. तिथून निघावसा वाटत नव्हतं पण पुढेही जायचं होतं म्हणून थोडा क्लिक्क्लिकाट करून पुढे आले आणि पुढे येउन पाहते तर अजून एक सुंदर तळं. तळ्यात सीगल पक्षी, खूप सारे हंस होते आणि त्या तळ्याच्या बाजूने चालायला रस्ता होता. तिथे एक फेरी मारून परत निघाले. इथे बरीचशी लोकं या पक्ष्यांना खायला घालायला येतात.

स्वप्नातली शामली

लेखक दिनु गवळी यांनी बुधवार, 01/06/2016 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण आता येतच नाही , समजावलय मी या वेड्या मनाला. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे, पण या काळजावर दगड ठेवला .. तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला , मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला. तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे. पण हळुहळु ती काजळ फिकी पडली. आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार. तुझ्या विना खरचं मी काहीच नाही . पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे. तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे. ( स्वप्नातली शामली)

झुक आयी बदरिया सावन की

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 01/06/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.

झुक आयी बदरिया सावन की

संध्याकाळचे साधारण पाच साडेपाच वाजले असावेत. पण आभाळ भरुन आल्याने कसं सारं अंधारलं होतं. पाऊस येणार अशी चांगलीच लक्षणे दिसत होती वार्‍यात अजुनही गरमीच होती, शिवाय धूळही, पण का कोणास ठाऊक ही पावसाची चाहुल ही एक भन्नाट गोष्ट आहे, सगळ्यांना कसे नकळत खेचुन आणते ते कळत नाही. ऑफीसच्या टॉप टेरेस ओपन क्यँन्टीन मध्ये नेहमीपेक्षा बरीच जास्त गर्दी होती. टेबलांवर नेहमी लावलेल्या छत्र्या मात्र आज काढुन ठेवल्या होत्या त्यामुळे कसे चारही बाजुंना अगदी क्षितीजापर्यंत नजर जात होती.

तापोळा -२ : तांब्या बुडूक

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 01/06/2016 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
घरं पेटवणारा माणूस रात्रीचं बाहेर पडायचा. ऊस तोडणाऱ्या नगऱ्यांची खोपटी पेटवून द्यायचा. राकेलचं डबडं आणि काडेपेटी घेऊन हिंडायचा. दिवसा बाजरीच्या ताटात, कडवाळात, फडात लपून बसायचा. छपराला एक ठिकरी जरी लागली तर एका रातीत जळून खाक. कवाडं घट्ट लावून वाडी झोपायची. कडी कोयंड्यात सांडशी, उंबऱ्यात दगडं ठेवून चिमणी विझवली जायची. मिट्टं काळोखानं उरात धडक्या भरायच्या. भिताडाबाहेरची भेसूर शांतता वळचणीला येऊन लपायची. वैऱ्याची रात्र वाडीला गिळून टाकायची. दगडी रस्त्यानं गाडी खडखडत चालते. डेरेदार झाडं पांघरुन मोठाले राक्षस डोळे मिटून घेतात. दाटिवाटीच्या रानातून त्यांच्या तलवारी सळसळत बाहेर येतात.

परीकथेची दोन सव्वा दोन वर्षे - भाग ८

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 01/06/2016 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
९ एप्रिल २०१६ आजी आजोबांनी नातवंडांचे हात धरून अक्षरे गिरवायला शिकवायचा काळ केव्हाच ईतिहासजमा झालाय. सध्या आमच्या रात्रशाळेत प्रौढशिक्षणाचे वर्ग भरतात. ज्यात परी आजीआजोबांचे बोट पकडून त्यांना स्मार्टफोन वापरायला शिकवते :) . . १७ एप्रिल २०१६ बाबड्या चुरूचुरू बोलायला लागलीय तशी कॉमेडी, आगाऊ आणि बरेच काही झालीय. प्रत्येक गोष्टीत आपले लॉजिक लावू लागलीय. त्या दिवशी गार्डनमध्ये आम्ही पकडापकडी खेळत होतो. तिच्या हाताला सहजी लागणार नाही एवढा वेग ठेवून मी पळत होतो. मी पुढे पुढे, ती मागे मागे. थोड्याच वेळात ती समजली, की पप्पाला काही आपण पकडत नाही. तसे म्हणाली, "जास्त नको पळू. थोडे थोडे पळ.

(आंब्याचे भरीत )

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 01/06/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : खरे तर आम्ही आमची ही सीक्रेट रेसीपी येथे शेयर न करण्याचा निश्चय केला होता. पण श्रीश्री.

आंब्याची कढी

लेखक सूड यांनी बुधवार, 01/06/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाऊण लिटर ताक, दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस, जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिंग, दोन मिरच्या बारीक चिरून, साखर मीठ आवडीनुसार कृती: ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा. साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची. थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. *फेसबुकावर पूर्वप्रकाशित. kadhi