Skip to main content

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 20/06/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

सद्भावना - हराभरा भारत

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 20/06/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तामधे प्रकाशित झालेला माझा एक लेख इंग्रजीतही या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि नुकतंच ते द बेटर इंडिया नावाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्‍या एका संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. तसं व्यापांमुळे फार योगदान देता येत नाही पण जी खरोखर मनोभावे हे काम करतायत, ज्यांनी हा वसा खर्‍या अर्थाने घेतलाय त्यांचा परिचय मात्र होतो.

प्रवास करताना सावधानता बाळगा !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 20/06/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे, बस किंवा विमानाचा प्रवास आपल्याला करावा लागतो. प्रवासी हा ग्राहक आहे. त्याला मिळणा-या सेवेत हलगर्जीपणा झाल्यास ग्राहकांनी त्याबाबत आवाज उठवायला हवा.

सत्यवान्/सावित्री

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
माधव न्याशनलाईझ ब्यांकेत कामाला होता... वडलोपार्जित ब्लॉक..वडील देवाघरी गेलेले होते.. घरात फक्त आई अन तोच राहायचा.. माधव चे लग्नाचे वय झालेच होते..१-२ मुली पण पाहिल्या होत्या पण त्याला पसंत नाही पडल्या... * दुपारच्या वेळी शेजारच्या जोशी काकू गप्पा मारायला आलेल्या होत्या.. गप्पा गप्पात जोशी काकूने सुचवले..म्हणाल्या की.."माझी दूरची साठे नावाची आते बहीण आहे तिची माधवी नावाची मुलगी लग्नाची आहे...चांगले लोक आहेत...मुलगी बी कॉम झाली असून आता कॉम्प्युटरचा कोर्स करत आहे..नाकी डोळी नीटस आहे..

लसणाचे लोणचे (पंजाबी स्टाईल)

लेखक आनंदी गोपाळ यांनी सोमवार, 20/06/2016 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस पडला की लोणच्याचा सीझन सुरू होतो. तर हे रविवारचा मुहूर्त काढून केलेले लसणाचे सोप्पे लोणचे. 01 साहित्य : २०० ग्रॅम लसणाच्या पाकळ्या, सोलून. व्हिनेगर : २ चमचे मोहोरीचं तेल : ३ चमचे (इतर तेलं टाकलीत तर ती चव येत नाही) हळद : १/२ (अर्धा) चमचा मेथीदाणे : १ चमचा लाल तिखट : १/२ चमचा बडीशोप : १ चमचा जिरेपूड : १/२ चमचा कलौंजी : १ चमचा मोहोरी डाळ : १ चमचा हिंग : १/४ चमचा मीठ : १ मोठा चमचा. कृती : लसणाच्या पाकळ्या ३-४ मिनिटे वाफवून घेणे.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -13

लेखक मेघना मन्दार यांनी रविवार, 19/06/2016 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग तेरावा - आज सकाळी बाहेर छान सनी वातावरण होतं ढगाळ नव्हतं. आज मला Palace Of Westminster पाहायचं होतं. त्यादिवशी उशीर झाल्यामुळे तो पूर्ण भाग बघायचाच राहिला होता. वेस्ट मिनिस्टर स्टेशन ला उतरले आणि पुन्हा एकदा बिगबेन पाहिल. तिथून पुढपर्यंत Palace of Westminister बघायला चालत गेले. लंडन मधील अत्यंत प्रसिद्ध असं हे प्रेक्षणीय स्थळ आहे. खूपच सुंदर बांधकाम आहे या इमारतीचे. इथे भरपूर फोटो काढले आणि याच्या आणि बिगबेन च्या बरोबर समोर असलेला पार्लिमेण्ट स्क्वेअर पाहिला. इथे आपल्या गांधीजींचा पुतळा आहे त्याच बरोबर नेल्सन मंडेला यांचाही आहे.

तबला/ढोलकिच जग

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 19/06/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच. लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्‍या बदलत गेल्या, जबाबदार्‍या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली. माणुस सत्तरीच्या पुढे.

इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 19/06/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती.

वस्त्रोद्योग : २.१ - सूतापासून कापडापर्यंत

लेखक प्रदीप साळुंखे यांनी रविवार, 19/06/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्रोद्योग : १ - कापसापासून सूतापर्यंत नमस्कार, मागच्या भागात आपण कापसापासून सूत कसे तयार होते ते पाहिले.आता या भागात आपण त्या सुतापासून कापड कसे तयार होते ते पाहूया. तर सूतापासून कापड विणण्यासाठी जी मशीन वापरली जाते त्याला मराठीमध्ये 'माग' असे म्हणतात,आणि इंग्लिशमध्ये loom. पण त्याआधी काही कंसेप्ट क्लिअर होणे गरजेचे आहे, आपण जर साधा शर्ट पीस घेतला किंवा धोतीचे विणकाम स्ट्रक्चर जर हाय ग्लास/पिक ग्लास(एक प्रकारची दुर्बीण) घेवून पाहिले तर धाग्यांची रचना खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे आढळेल.