...लहान दिवा लवकर विझतो!
खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही.
झालं असं कि काल कामानिमित्त मुंबईत जाणे झाले. एकट्याने जायला कंटाळा आला आणि येताना समानहि होते आणायचे म्हणून जोडीला विकास नावाच्या मित्राला घेऊन गेलो. विरार ला पोचल्यावर त्याने एक आठवण सांगितली, विकासची एक वर्षाची पुतणी 3-4 महिन्यांपूर्वी आजारी पडली होती. न्युमोनिया झाला होतं तिला आणि त्यांनी तिला विरारमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. छोटीला उपचारांनी बरे तर वाटत होते पण रुग्णाच्या तब्बेतीतील प्रगती विचारल्यावर डॉक्टरांची उत्तरे कायमच घाबरवणारी असायची असे तो म्हणाला.
मिसळपाव