Skip to main content

लिखाण

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 21/08/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

मोदी बरे ,अमित शहा वाईट ?

लेखक खाबुडकांदा यांनी सोमवार, 21/08/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला.

भाषण

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी सोमवार, 21/08/2017 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) "मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

अभेद्य राजगड व वाघरु , एक अनुभव

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 21/08/2017 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
"राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले.

लिफ्ट करा दे

लेखक सरनौबत यांनी सोमवार, 21/08/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ्ट करा दे दिवसभर ऑफीसमध्ये एकामागोमाग एक मिटींग्समुळे पुरती दमणूक झालेली. संध्याकाळी उशीरा एकदाची कामं संपली. आता घरी जाऊन मस्तपैकी अंघोळ करायची आणि मग टीव्हीवर 'चला हवा येऊ द्या' बघत जेवायचं ह्या विचारात घराजवळ कधी पोचलो समजलंच नाही. तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे.

Ugly- सगळे प्रश्न सोडवूनहि अनेक प्रश्न विचारणारा चित्रपट!

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 21/08/2017 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिरीष कणेकर फिल्लमबाजी मध्ये एक गोष्ट सांगायचे. “नाटकाचा/ चित्रपटाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात किंवा सुरुवातीला भिंतीवर बंदूक दाखवली तर नाटक/ चित्रपट संपेपर्यंत तिचा बार उडालाच पाहिजे...” म्हणजे थोडक्यात काय तर नाटक, चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रत्येक दृष्याची, धाग्याची कथेशी संगती अखेर पर्यंत तरी जुळलीच पाहिजे. सगळी कोडी सुटली पाहिजेत. असा हा अलिखित नियम. तो न पाळणारे ते ढिसाळ, निष्काळजी दिग्दर्शक किंवा लेखक... आता मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो.

गेम थेअरी : खोटे पणाने नुकसान कसे होते ?

लेखक साहना यांनी सोमवार, 21/08/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नितीश कुमार हे आधी भाजपचे चांगले मित्र होते. अचानक भाजप त्यांना कम्युनल वाटू लागला आणि त्यांनी तिसरी चूल मांडली. काही वर्षांनी भाजप त्यांना जवळचा वाटू लागला आणि ती चूल मोडून ते पुन्हा भाजपात आले. अश्या प्रकारची शेकडो उदाहरणे आपणाला राजकारणात सापडतील. सामान्य माणसाला अश्या व्यवहाराचे आश्चर्य वाटेल पण राजकारणातील अश्या प्रकारच्या तडजोडी आणि "पास्ट इस पास्ट" अश्या प्रकारचे वागणे त्यांना बहुतेक वेळा फायदेशीर ठरते. पण खोटेपणा नक्की किती करावा ? दुसर्याने तुम्हाला गंडवल्यास तुम्ही त्याच्याशी कसे वागावे ? ह्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट मधून मिळतील.

Cool देवी

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी रविवार, 20/08/2017 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंगेश पंचाक्षरी, नासिक. दै सकाळ मध्ये 6 ऑगस्ट ला प्रसिद्ध झालेला माझा लेख. गुगल, जी पी एस यासारखी साधने वापरून जगात कुठेही काहीही शोधून काढणाऱ्या पुरुषाना त्यांची बायको 'तिखटमीठाचा' डबा आणा हो आतून" असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र तो नेहमीच कावरा बावरा होतो. तिखटमीठाचा डबा आणि पोळ्यांचा डबा सारखाच दिसत असल्याने तो हमखास चुकीचा डबा आणतो. एकदा अंगाला 'हळद' लागली की पुरुषांना तेल- मसाल्याचे भाव समजायला सुरुवात होते. पण स्वयंपाकघर ही मात्र खास बायकांची मक्तेदारी. तिथे त्यांचं राज्य असतं. अर्थात यास काही अपवाद ही असतीलच म्हणा. पण एकूणच डाळी, पीठ, साखर, पोहे ,रवा यांचे डबे तिला बरोबर सापडत असतात.

असं असतं थाई लग्न!!

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 20/08/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात की एखाद्या देशाचं अंतरंग, समाजमन, संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायची असल्यास तेथील भाषिक सिनेमे, नाटक किंवा लोककला पहा. यात मी अजून एक सुचवेन ते म्हणजे स्थानिक "लग्न सोहळा" पहाण्याची. धर्मश्रद्धा किंवा परंपरा त्यातून प्रतीत होणारे समाजमन अनुभवण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळते असं मी म्हणेन. अर्थात अशी संधी सगळ्याच मिपाकरांना प्रत्यक्ष मिळेलच असं नाही म्हणून मग धृतराष्ट्राला संजयने जसा युद्धाचा आँखों देखा हाल सांगितला तसाच मी तुम्हाला एका थाई लग्नाचा सांगणार आहे. (बाकी लग्न आणि युद्ध तसे समानर्थीच शब्द आहेत, फार फरक नाहीये दोघांत).