Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः प्रकाशची बर्फी

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 25/08/2017 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशची बर्फी दादरच्या प्रकाशमध्ये पूर्वी ही पांढरी शुभ्र ,वर फक्त चारोळी घातलेली बर्फी मिळत असे .आता दूर राहायला गेल्यापासून प्रकाशमध्ये वारंवार जाणे जमत नाही, आणि गेलो, तरी आता ती बर्फी मिळत नाही, एकतर थोडीशी काळपट दिसते, शिवाय वर पिस्ता कप लावलेले असतात. म्हणून म्हटलं, करून पाहू. गुगलबाबाच्या कृपेने निशामधुलिका यांची कृती मिळाली, नेहमीसारखा पाक करून खवा घालून आटवा, अशी कृती नव्हती म्हणून खूप बरे वाटले.

बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 25/08/2017 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात.

चारोळी

लेखक अमित रेडीज यांनी गुरुवार, 24/08/2017 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ढग भरून आले कि नेहमीच पाऊस पडतो पण मन भरून आलं कि त्याला एकांताचाच कोपरा लागतो

महामानव

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 24/08/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
काव्यरस

अनवट किल्ले १७: गुरुचरित्राचा दाखला , महिपालगड(Mahipalgad )

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 24/08/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही किल्ल्यांची नावेच त्याचे प्राचिनत्व स्पष्ट करतात. असाच एक बेळगावजवळचा किल्ला "महिपालगड". प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही. औरंगजेबाच्या वावटळीत काकतीचा देसाई आणि हुक्केरीचा देसाई अलगोंडा यांनी मोगलातर्फे या भागातील किल्ले ताब्यात घेतले होते, त्यात कदाचित हा असेल. ईथे जायचे म्हणजे दोन मार्ग आहेत. १ ) बेळगाव- सावंतवाडी रस्त्यावर शिनोळी नावाचे गाव आहे. इथुन देवरेवाडी नावाच्या गावाकडे रस्ता जातो. हाच डांबरी रस्ता पुढे थेट गडावर जातो. शिवाय जाता जाता आरोग्यभवानी , वैजनाथाचे मंदिर व कार्तिकस्वामी गुंफा पहायला मिळते. बेळगाववरून गडावर यायला बससेवा आहेत. या बसेसच्या वेळा सकाळी ८.३०, १०.०० ( देवरेवाडी),१२.००, २.००( देवरेवाडी), ४.००, ७.००, ९.००( मुक्कामी). स्वताची गाडी असेल तर कोल्हापुर- बेळगाव रस्त्यावर यमनापुर गावातून थेट चंदगड रस्त्याला लागायचे आणि वर सांगितल्याप्रमाणे शिनोळी मार्गे गडावर. २ ) दुसरा मार्ग म्हणजे गडहिंगलजमार्गे कोवाड ते थेट महिपालगड असा आहे. पण कच्चा रस्ता आणि वैजनाथाचे मंदिर दुसर्‍या बाजुला राहिल्यामुळे हा मार्ग सोयीचा नाही. mhp1 महिपालगड परिसराचा नकाशा मी बेळगाव परिसरातील गड पहायचे ठरविले. आधी हुन्नुरगड पाहून बेळगाव गाठले. तिथला भुईकोट पाहून दुसर्‍या दिवशी महिपालगडाचा प्लॅन केला. पण दुसरा दिवस रंगपंचमीचा होता. त्यामुळे बससेवा बंद केली गेली. सहाजीकच एस.टी.ने शिनोळी गाठले. इथे देवरेवाडीपर्यंत जाण्यासाठी काहीही मिळणार नाही हे समजल्यानंतर लेफ्ट-राईट शिवाय पर्याय नव्हता. चलो देवरेवाडी. चालत निघाल्यानंतर बरेच लष्करी ट्रक ये जा करीत होते. महिपालगडाच्या शेजारच्या पठारावर हे लष्करी जवान प्रस्तरारोहणाचा व ईतर काही साहसी गोष्टींचा सराव करतात असे समजले. वाटेत दुतर्फा स्टीलचे कारखाने दिसत होते. mhp2 समोर आडव्या भिंतीसारखा पसरलेला महिपालगड दिसत होता. गावात रंगपंचमीचा यथेच्छ धुडगुस चालु होता. त्यामुळे गावाच्या आधीच उजव्या बाजुच्या शेताडीत घुसलो आणि एक देउळ दिसले त्याच्या दिशेने चालु लागलो. mhp29 एक सुंदर गजाननाची मुर्ती असलेले मंदिर पाहून डांबरी रस्ता गाठला. थोडा चढ चढल्याबरोबर एक मंदिराचे संकुल सामोरे आले.

मुहूर्तांचे प्रस्थ

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 24/08/2017 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता.