Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः स्ट्रॉबेरी कलाकंद

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 01/09/2017 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्रॉबेरी कलाकंद साहित्य: स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम, पनीर १०० ग्रॅम, साखर १०० ग्रॅम, खवा १०० ग्रॅम, वेलची पावडर, बदाम काप कृती: मी तयार मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश वापरला पण ताज्या असतील तर जास्त चांगल्या! खवा, साखर, पनीर आणि स्ट्रॉबेरी क्रश सर्व एका कढईत एकत्र करावे. मंद गॅसवर ढवळत राहावे. ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा. बदामाचे काप करावे. मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा होऊ लागला की खाली उतरून वेलची पावडर घालावी, छान घोटावे. गोळा झाला की ताटात थापावा. बदामाच्या कापानी सजवून वड्या पाडाव्या.

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ७ : कुण्या देशीचे पाखरू!

लेखक Naval यांनी शुक्रवार, 01/09/2017 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बाळाविषयी कधीतरी लिहायचं, हा विचार फार दिवसांपासून मनात घोळत होता. कित्येक वर्षांनी लिहायला बसले आणि अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या. आई होण्याचा माझा दहा वर्षांचा प्रवास हळहळू उलगडायला लागला. ह्या प्रवासाची सुरुवात झाली, जेव्हा आई होण्याची इच्छा पहिल्यांदा माझ्या मनात जागृत झाली त्या दिवसापासून. मला नीट आठवतं, मी तेव्हा दहावीत होते. आमच्या घरासमोर राहणारी माझी आवडती ताई तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी आली होती. मी सारखी तिच्याकडे जात असे. एका गरोदर स्त्रीला मी इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहत होते.

मोरया

लेखक रवि बदलापूरेकर यांनी गुरुवार, 31/08/2017 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोरया मोरया मोरया ओमकारा मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया भरली सुखाची ओंजळ बाप्पा तुझ्या आगमनाने, जाहलो मी धन्य देवा तुझ्या दर्शनाने तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता मोरया तू मंगलमूर्ती मोरया तू दिसे सारे ब्रह्मांड तूज नयनी वसे चारीधाम तूझ्याच चरणी, चराचरातील रूप तुझे देई भक्तांना दर्शन आपुले चुका भक्तांच्या घेई तू उदरा येता शरण देई तूच आसरा, धरी तू छताची सुख सावली अशी तू माझी माय माउली आला सोडूनी तू कैलास सोबतीला तुझ्या मुषकराज, कसे थांबवू सांग तुला तू आईबाबांचा बाळ सुकुमार तू तू गजराज, तूच गणनायक तू विघ्नहर, तूच विनायक, तू सुख
काव्यरस

बाप्पाचा नैवेद्य : आमरसाच्या सांजोर्‍या

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 31/08/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना गेणेशोत्सावाचा हार्दिका शुभेच्छा!! घरोघरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. मीसुद्धा अशीच एक पारंपारीक पाककृती बाप्पांसाठी येथे देत आहे.