Skip to main content

मान गए पंतवैद्य...

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 14/09/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

उदय कॉर्लिग्झम्सचा भाग २

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 14/09/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1( http://www.misalpav.com/node/40857) आपल्या परिवाराला आपण धर्मामुळेच गमवावे लागले अशी भावना मायकलमदधे मुळ धरु लागली होती. त्या दिवशी आपण त्या धर्मस्थळी जायला नको होते हा विचार त्याला पोखरुन टाके. मायकलची अशीच विचारांची तंद्र्ी लागली होती. धर्मस्थळावरच का हल्ला झाला ? कारण त्यांना धर्मावर हल्ला करायचा होता .मुळात धर्मावर हल्ला होतो म्हणजे नक्की काय होत? तर धार्मिक प्रतिकांवर हल्ला होतो. जर ही धार्मिक प्रतिकेच नसतिल तर ? जर असा एक धर्म असेल की ज्याची नक्की परिभाषाच नसेल , धर्मस्थळ नसेल , धर्मग्रंथ नसेल.

गच्ची वरुन...

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 14/09/2017 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे. आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय. --चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ? --भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या --बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर --सगळ्याना द्यायला सोपे जाईल...

उपोषण

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 14/09/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
उपोषण (कविता कालावधी 1996) घुसमटणारी वेदना धुमसणार छत दाबायला जातो मी होत ज्वालामुखीच तोंड ज्वालानदी ही चिरडत वाहते सर्व घर ती वाहुन नेते बसतो मी मग उपोषणास एकटा सदैव एकटा तीन मंत्री घेऊन येतात हातात ग्लास त्यात रस तीन संत्रांचा असतो पण वाटत नाही मी तो नाकारतो कारण त्याच्यावर माझा विश्वासच नसतो येतात तसे जातात तीन मंत्री धूळ चढते गर्दी हटते राहते उजाड स्थळ त्या ठिकाणी दिसते एक निराश खिन्न वीराण शव ते असते माझे सतत पेटणार्याचे राहते तसेच कारण मी उपोषणाला बसलेला असतो

माणसं !

लेखक फिझा यांनी गुरुवार, 14/09/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं ! महाग झालेली पुस्तकं परवडत नाहीत हल्ली पण स्वस्त झालेली माणसं वाचायला मिळतात ! अन सगळीकडे उपलब्ध पण असतात ! कधी कधी पटकन वाचून होतात माणसं कधी समजतच नाहीत, कळतंच नाहीत माणसं ! छोटी माणसं , मोठी माणसं जाड माणसं , बारीक माणसं ! खरी माणसं , खोटी माणसं , सगळ्या साईजची ,सगळ्या विषयांची माणसं ! काही अबोल, अव्यक्त, मनकवडी माणसं काही बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं आपणंच विशेषणे दिलेली माणसं स्वतःला विशेषणे लावून घेतलेली माणसं ! काही आपली , काही परकी माणसं दूर जाऊनही जवळ असलेली माणसं ! खोल खोल मनामधली, मनकवडी माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !

नासाच्या जवळी

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 14/09/2017 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : आजीच्या जवळी घड्याळ कसले..) कवितेचा कालावधी - सन 1996 नासाच्या जवळी यान कसले आहे चमत्कारिक पुढे पुढे ते जाते अचूक कोणास कसे ठावुक त्याची पीरपीर चालते कधीतरी त्रास फार टाकते परंतु मोठ्या ग्रहाजवळ जाऊनी माहिती ते आणते गॅलिलिओ नाव ठाऊक असे मला तयाचे गरगर फिरत स्वताभोवती माहिती सारखे पाठवते तीन दोन एकच्या तणावात उडते ते पृथ्वीवरून सरसर उंच जाऊन विराजते चंद्रापासून आज इकडे तसेच उद्या त्या तिकडे जायता पाठवते झरझर ते चित्रांच्या गंमती सदा होऊनी गेली वर्षे पाठवूनी त्यास पत्ता कधी न लागला संपत आले काम तयाचे पुढे ते जाई आता एकला पायोनियर व्हॉयेजर ती पुढे शांतपणे गेली पाठवत राहिली नवनवी माहित

निरोपाची आठवण

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 14/09/2017 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ६

लेखक जुइ यांनी गुरुवार, 14/09/2017 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ आज काही मॉन्युमेंट्स पाहावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने कुच केले. आजही हवेत गारवा जाणवत होता. सतत चालत राहिल्यामुळे खूप जाणवत नव्हते.

मिठी

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 14/09/2017 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं "सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही" आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर हळूच हसंत म्हणाली असती "आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही" मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत.. दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत पूर्वीच्याच अल्लडपणे.

संघर्ष : भाग ०२

लेखक दिपक लोखंडे यांनी बुधवार, 13/09/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०१ पासून पुढे. राधा घाईघाईने खाली उतरून लगेच घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षात बसली तिने रिक्षा चालकाला पत्ता सांगितला तिचे डोळे अजूनही डबडबलेले होते. तोच राधाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे गेलं अनिकेतचा फोन होता. खरंतर राधा त्यावेळी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती तरी तिने एक मोठ्ठा श्वास घेऊन फोन कानाला लावला. ‘हॅलो.’ दबक्या आवाजात राधा म्हणाली. ‘हॅलो राधा.