Skip to main content

मी माझे तारांगण सादर करतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 25/09/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कुठे कोणाचा आदर करतो पाठीवरती वार बिरादर करतो प्याद्याला आदेश रणाचा देतो नि तिथुनी घुमजाव बहादर करतो गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर देवाचे रक्षण जमगादर करतो तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी मी अवघ्या देहाची चादर करतो आळ नको घेऊ, झाडाझडती घे (मी माझे तारांगण सादर करतो) देव दयाळू आहे कळल्यापासुन रोज नवे कन्फेशन फादर करतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

भ्रम

लेखक nishapari यांनी सोमवार, 25/09/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराच दिवसांपूर्वी मला अशोक ह्याच शहरात असल्याचं समजलं होतं . तेव्हापासून आज भेटेन उद्या भेटेन अशी चालढकल चालली होती , नक्की दिवस ठरत नव्हता . तोही बेटा बिझी . त्यामुळे भेट पुढे पुढे जात होती . अशोक माझा लहानपणीचा मित्र . माझ्याहून 2 वर्षांनी मोठा होता . काही वर्षं आम्ही शेजारी राहत होतो , त्यानंतर त्याच्या वडिलांची बदली झाली आणि तो बंगलोरला गेला , मी माझ्या कॉलेजच्या नवलाईत हरवून गेलो , तो त्याच्या शिक्षणात . फारसा संपर्क असा ठेवला गेला नाही , कधीमधी फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच . पुढे त्याने सायकॉलॉजी विषय निवडला , मी कॉमर्स मधल्या डिग्र्यांच्या मागे लागलो .

डंकर्क... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 24/09/2017 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क भाग -२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire हिटलर त्याच्या जनरल बरोबर चर्चा करताना. सर्व जनरल्स..कायटेल, फॉन बॉक व गुडेरियन या अशा महाकाय सेनेसमोर कोण उभे ठाकले होते तेही बघुया एकदा. दोस्तराष्ट्रांच्या सेनेत फ्रेंच आर्मी ग्रुप-१ च्या ५१ डिव्हिजन होत्या ज्याचे नेतृत्व करत होता जनरल बिलोट्टे. या ५१ डिव्हिजनमधे ब्रिटीशांच्या एक्सपिडिशनरी फोर्सच्या ९ डिव्हिजन होत्या.

बुलेट ट्रेन ( भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण

लेखक Anand More यांनी रविवार, 24/09/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले.

भारत चीन युद्ध – १९६२! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 24/09/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत चीन युद्ध – १९६२! भाग१ संदर्भ – १. न सांगण्या जोगी गोष्ट – मेजर जनरल(नि.) शशिकांत पित्रे २. An Era of Darkness: The British Empire in India- Shashi Tharoor ३. 1962: The War That Wasn't - Shiv Kunal Verma ४. ‘ माओचे लष्करी आव्हान’, - दि. वि. गोखले ५. वालॉंग ..एका युद्ध कैद्याची बखर – ले. क.

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

उरल्या त्या फक्त आठवणी

लेखक RDK यांनी शनिवार, 23/09/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुखरूप आणि सुरक्षित अशा गावातून बाहेर पडलो निघून आपल्या परिवारातून जगामध्ये आलो नशीब आजमावण्या कठीण परिश्रमही केले जगणे ना मजला कधीही कळाले हसण्याचा आवाज माझाच माझ्या पडतोय कानी जणू काही मलाच चिडवू पाहतोय गाणी गायलेली शाळेतील माझ्या माझ्या जखमांवर फुंकर घालताहेत एकेक मित्र उडत येवून  हातांनी मोठा घेर बनवताहेत बनून डोक्यातले विचारचक्र गरगर फिरताहेत थंडीच्या दिवसातील थंडी उन्हाळ्यातही वाजतेय "आजारी पडलो का ?" म्हणून  हात कपाळावर जातोय उडता आले असते तर गावी उडून गेलो असतो परतता आले असते  तर भूतकाळाला घट्ट बांधून ठेवले असते भिंतीच्या कोपऱ्यात लपून बसावेसे वाटतेय बाहेर

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 23/09/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

लेखक पुंबा यांनी शनिवार, 23/09/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.

सनी देओल, तू पुन्हा वापस ये!

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 23/09/2017 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो तो काळ. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या गावातच कुठल्याही वर्तमानपत्रात उमेदवारी करणं अपेक्षित होतं. तशी मी करत होतो. मी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो, त्यात एकदा बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर लेख आला होता. त्या लेखात धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी धर्मेंद्रच्या परंपरेचा सत्यानाश केला या अर्थाची काही वाक्यं होती. तो लेख प्रकाशित झाल्यावर पत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे यवतमाळ, बीड, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि तत्सम जिल्ह्यांमधून वर्तमानपत्राच्या मुख्य कचेरीत आले.