मुंबई ते कन्याकुमारी सायकल मोहीम....२० वर्षांपूर्वी
मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो.
साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती.
मिसळपाव