..आवडलं.
सामाजिक जाणीव असलेले पत्रकार इथे (आणि इतरत्र) अशा घटना मांडताहेत हे नक्कीच आशादायक आहे. तुम्ही पत्रकार आहात तर या वृत्तातील रणरागिण्यांची आणि त्यांच्या सहकार्यांची छायाचित्रे मिळवून इथे ओळख करून द्याच, पण तेवढ्यावर न थांबता आज सहा महिन्यांनंतर त्या गावात परिस्थिती काय आहे त्याचाही पाठपुरावा करा. Hopefully, बाटली अजून 'आडवी'च असेल अशी आशा आहे.
चांगल्या लिखाणाबद्दल धन्यवाद!
दादानु, गैरसमज होतोय. मी पत्रकार नाहीये. एका पत्रकाराच्या लेखणीतुन हे कथानक उतरलेय असा या कथेचा प्लॉट आहे. आणि फोटो च हवा असेल तर वर मी दिलेली लिंक पाहा तिथे आहे. धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
श्री कुलकर्णी, कथा चांगली वाटली. महिलांचे अभिनंदन. श्री ॠषिकेश यांनीही नुकतीच एका महिलेची यशोगाथा सांगणार्या पुस्तकाची चांगली ओळख करून दिली होती. मूळ लेखास श्रेय देण्याचा प्रामाणिकपणा आवडला.
अवांतर: दारूबंदीवर लेखन करणार्या एका महिला सदस्यास एका मराठी संकेतस्थळावरून पळवून लावण्यात आले होते. दारुच्या कट्ट्यांच्या व कॉकटेलच्या कृतींच्या कथा येथे चघळल्या जातात. मद्याच्या अंमलाखाली केलेल्या माकडचेष्टांना भरघोस प्रतिसाद मिळतो, मद्य पिऊन बोळे काढण्याचे वर्ग चालवले जातात. त्या पार्श्वभुमीवर तुमचा लेख टीकून राहणे हे चांगल्या बदलाचे लक्षण आहे.
धन्यवाद.
अक्षयजी तुमच्या प्रतिसादातील खंत आणि आनंद दोन्ही लक्षात आले. पण एक सांगणे आहे... मिपावरील लेखन हे प्रत्येक लेखकाचे वैयक्तिक विचार असतात. त्याच्याशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. आणि प्रत्येक लेख हा सिरियसली घ्यायलाच हवा असेही नाही. काही लेख केवळ गंमत म्हणुन लिहीलेले असतात किंवा उपहासात्मकही असतात.
बाकी तात्या काय ते स्पष्टीकरण देतीलच. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
उत्तम लिहिलं आहे...
दादानु,
सुंदर
दारुबंदीला मिपावर बंदी नाही
धन्यवाद.