मिपाच्या नवे लेखन यादीत डोकवता
'शामो' स्वतःशीच म्हणाला,
"(गणित),दहाजणीत!,<अगणीत>,((गणित)),(झिरो), झणझणीत,[गणित!] ,<<<<सणसणीत>>>>,[वळीत] -
विडंबन झाली का पूर्ण?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंदका
आणि सहज एक विचार डोकावला...
***
खेद लपवून वाचताना
यादीवर पाहिलं त्यांन
तेव्हा 'विडंबनां'ची त्याला
एक संख्या दिसली...
दिसणं, आणि असणं
या जालाचा नियम
उमजेपर्यंत तो हरला...
मुळ कवितेचे प्रतिसाद
मोजले तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ती संख्या म्हणाली,
"येव्हडीतर विडंबने झालीत!"
रचना: केव्हातरी, २००९
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 7:31 pm | श्रावण मोडक
रादर, प्रतिसादांपेक्षा विडंबनं अधिक!
आता मोजणी कारकुनाच्या भूमिकेत शिरतो!!! ;)
22 Oct 2009 - 7:32 pm | अवलिया
आता पुढील दिवाळी पर्यत श्रामो कविता प्रसवत नाहीत की काय ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
22 Oct 2009 - 7:34 pm | चिरोटा
मिपाने आता "विडंबन overflow error " नाही दिली म्हणजे मिळवल.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
27 Oct 2009 - 4:48 pm | अजय जोशी
विडंबनाच्या कारखान्यात एकंदर किती कामगार असतील?
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी