Skip to main content

गणित!-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/10/2009 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवे लेखन यादीत डोकवता 'शामो' स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,अगणीत>,((गणित)),(झिरो), झणझणीत,[गणित!] ,सणसणीत>>>>,[वळीत] - विडंबन झाली का पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका आणि सहज एक विचार डोकावला... *** खेद लपवून वाचताना यादीवर पाहिलं त्यांन तेव्हा 'विडंबनां'ची त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या जालाचा नियम उमजेपर्यंत तो हरला... मुळ कवितेचे प्रतिसाद मोजले तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "येव्हडीतर विडंबने झालीत!" रचना: केव्हातरी, २००९
लेखनविषय:

वाचने 1499
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

रादर, प्रतिसादांपेक्षा विडंबनं अधिक! आता मोजणी कारकुनाच्या भूमिकेत शिरतो!!! ;)

आता पुढील दिवाळी पर्यत श्रामो कविता प्रसवत नाहीत की काय ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिपाने आता "विडंबन overflow error " नाही दिली म्हणजे मिळवल. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

विडंबनाच्या कारखान्यात एकंदर किती कामगार असतील? (आपला पुणेरी) अ. अ. जोशी