बस....

मसक्कली's picture
मसक्कली in काथ्याकूट
6 Oct 2009 - 11:13 am
गाभा: 

आदर्णीय,
मिसळपाव मित्रमण्डळी....हा प्रसन्ग रोज बर्‍याच मण्डळी सोबत होतो :B

बस ने प्रवास करणारे लोक जास्त अनभवु शकतात... #:S

स्टोप वर थाबुन रोज आपली बस यायच्या वाटेकडे डोळे लाउन पाहत आसतात्. :<
मग सुरु होते ती आपल्या बस शोधायची मोहीम...१ जाते २जाते जीव वैतागतो ~X(

आनी बगता बगता सुरु होते ती खुन्नसेला... B) >:P

बस दिसली की खुश होउन पुढे जातो .... :)
पण्....जेव्हा कलते कि ती आपल्याला लागनारी बस नाही तर तिला आस तूच्छ लेखतो.. /:)

नाही का... ;) >:)

तर मित्र हो तुमी पन तुमचे अनुभव इकडे मान्डा... :)

धन्यवाद...!!

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2009 - 11:20 am | बिपिन कार्यकर्ते

बसने प्रवास करायचा फारसा अनुभव नाही. (|: 8| 8>

त्यामुळे काय लिहू? :SS [( #o

पण तुम्ही तुमचा अनुभव मांडा की. नुसता धागा टाकून का पळताय? >:) X( ~X(

... :) B) =))

बिपिन कार्यकर्ते

पर्नल नेने मराठे's picture

6 Oct 2009 - 11:22 am | पर्नल नेने मराठे

8| एवढा वेळ वाट पाहण्यापेक्शा कॅबने जावे :|
चुचु

मसक्कली's picture

6 Oct 2009 - 11:31 am | मसक्कली

आमाला रोज बरेच आनुभव आसतात हो...आमी काय मीडल क्लास लोक बसच परवडते हो आमाला.... @)

आमी लोकान्चे आनुभव जानन्याचा प्रयत्न करत आहोत...

हा मनोरन्जन म्हनुन टाकलेला धागा आहे....

लोकानी चन्गले वाइट कसेही अनुभव टाकले तरी चालतात ना... ;)

विशाल कुलकर्णी's picture

7 Oct 2009 - 12:36 pm | विशाल कुलकर्णी

मुंबईहुन विमानाने चेन्नईला उतरलो. भारतातील रुटीनप्रमाणे रात्रीची फ्लाईट असल्याने लेट झाली. १०.३० ची फ्लाईट दिड तास लेट होवुन १२.०० वाजता चेन्नईत लँड झाली. साहजिकच मी बुक केलेली चेन्नई ते कारेकल वॉल्वो ११.३० लाच निघुन गेली होती. ६०० रुपयाला बांबु लागला होता. शेवटी मी वैतागुन स्टेट ट्रान्सपोर्टची बस पकडली. चेन्नई सोडले आणि पाऊस सुरु झाला. म्हणुन खिडकी बंद केली तर गरम व्हायला लागले. बसमध्ये पंखा होता पण नियमाप्रमाणे ;-) तो नादुरुस्त होता. कंडक्टरला विचारले तर त्याने आपले सुंदर (सोन्यासारखे पिवळे) दात दाखवले आणि म्हणतो "साब, गरमी लगते है,तो विंडो खोलनेका ना!"
त्याला विचारले, "अरे भाई, लेकीन बारीश हो रही है!"
त्याचे उत्तर होते...
"सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !"

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भडकमकर मास्तर's picture

9 Oct 2009 - 4:51 pm | भडकमकर मास्तर

सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !"
हेय लै भारी.. :)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

9 Oct 2009 - 4:51 pm | भडकमकर मास्तर

सोsssssरी साब, वो उपरवालेका काम है, हम कैसे इंटरफीर करेंगा !"
हेय लै भारी.. :)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चिरोटा's picture

6 Oct 2009 - 11:48 am | चिरोटा

इकडे बस येणे हाच आधी मोठा अनुभव असायचा.वेळेवर येणे तर दूरच राहो.पुर्वी ५ रुपयांचे तिकीट असले तर फक्त २ रुपये देवून तिकीट न घेता ३ रुपये वाचवायचे असा प्रकार होता. तो आता बराच कमी झाला.
सध्या नविन वॉल्वो बसेस चालु झाल्या आहेत. त्या बर्‍याच्श्या वेळेवर येतात. वातानुकुलीत बसेस आणि FM radio आणि आजुबाजुला 'जंटल्मन' लोक ह्यामुळे प्रवास सुसह्य होतो.

भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमोल केळकर's picture

6 Oct 2009 - 12:23 pm | अमोल केळकर

हे पहा आमच्या कडे पण तुमच्यासारखीच बस आली आहे
१०५ नं - स्वामी विवेकानंदनगर ( सी.बी.डी ) ते बान्द्रा

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छोटा डॉन's picture

6 Oct 2009 - 3:21 pm | छोटा डॉन

वा वा, शहरी बस वहातुकीसाठी महाराष्ट्रातपण वॉल्वो आल्याचे पाहुन आनंद झाला, मस्त आहे.

आता सौजन्य सप्ताह कधी मग ह्या बस चा ?
"भांचुत, एक दिवस झंटलमनासारखे वागाल तर काय मराल काय ? " : इति कंडक्टर ( भाईकाकांच्या एका लेखातुन साभार ... ;) )

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

सखाराम_गटणे™'s picture

6 Oct 2009 - 11:53 am | सखाराम_गटणे™

पुन्यातले का तुम्ही?

टुकार बससेवा पुण्यात येउन अनुभवावी.

मसक्कली's picture

6 Oct 2009 - 11:58 am | मसक्कली

क्रूपया इथे चर्चा करवि निन्दा नाही....धन्यु..

आनुभव शेअर करन्याकरिता आहे .

at and post : janadu.

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 12:18 pm | विशाल कुलकर्णी

लै भारी आणभव हायती आमचेबी. एका टायमाला पुन्यात चतुरशिंगीचं तिकट काडलं पगा, आन म्हायिती नसल्याने चुकुन चवाणनगरला उतारलो, तर कंडाक्टरमामांनी आसलं काय काय ऐकिवलं की इचारु नगासा......

दुसरा आणभव होता डेन हाग (हॉलंड) चा. इतनं बस पकाडली आन मडुरोडमचं तिकट काडलं बगा. चुकुन बस दोन ठेसनं फुडं गेल्यावर लक्षात आलं. आनं डायवरदादांची माफी मागुन उतराया गेलो, तर येडं त्येच आमची दहा येळा माफी मागायला लागलं. आमाला चुकीच्या ठेसनावर उतरीवलं म्हुन.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मसक्कली's picture

6 Oct 2009 - 12:29 pm | मसक्कली

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आपल्या कड शिव्या घातल्या आसत्या तुला तुज कळत नाय का म्हनुन.... X( ~X(

तीकडे माफी,,,, =)) =)) =)) =)) =))

हसु हसु लोळ्ले रे बाबा... :D

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी

तेच झालं होतं पुण्यात ! अगदी मुंबईत देखील अनुभव वेगळा नव्हता.
अर्थात हॉलंडमध्येदेखील शहरातुन चांगला अनुभव येतो. पण तुम्ही जरा इंटेरिअरमध्ये गेलात की लक्षात येतं .....
"घरोघरी मातीच्याच चुली!" ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आशिष सुर्वे's picture

6 Oct 2009 - 2:36 pm | आशिष सुर्वे

जेव्हा विमानप्रवास आजएवढा स्वस्त नव्हता, तेव्हा मी बंगलूरू ते मुंबई आणि परतीचा प्रवास 'बस' ने करायचो..
बंगलूरू ते मुंबई प्रवासाला कमीतकमी १६ आणि जास्तीतजास्त १८ तास लागतात.
'कोंडुसकर', 'व्ही.आर.एल.', 'शर्मा', 'नॅशनल', 'के.स.आर.सी.टी.' ह्यांच्या छान 'व्हिडीओकोच' व्होल्वो बसेस आहेत..
ह्या सर्व बसेस 'मॅजेस्टिक' ह्या ठिकाणाहून सुटतात.. ('मॅजेस्टिक' म्हणजे मुंबईचे 'मुंबई सेंट्रल') ह्यांचे बुकींग 'आंतरजाला'वरून केले तर सुरक्षित असते.. कारण काही 'बुकींग एजंटस' त्यांच्या मर्जीप्रमाणे एन वेळी तुमच्या आरक्षित जागेची अदलाबदली करू शकतात..
असो, तर्र हा १६ ते १८ तासांचा प्रवास अगदीच कंटाळवाणा नसतो. कारण अंदाजे ८ वाजता ह्या व्होल्वो निघतात आणि लगेचच एखादा नवा हिंदी चित्रपट लावला जातो.. हा चित्रपट संपायच्या सुमारासच बस एखाद्या हॉटेलात शिरते (अंदाजे ११ वाजता) .. जेवण झाल्यावर मग टी.व्ही बंद केला जातो.. आणि मग बहुतेक सर्व प्रवाशी आपापल्या निमुळत्या जगात झोपण्याचा प्रयत्न करु लागतात.. जे यशस्वी होतात, त्यांचे डोळे जेव्हा उघडतात, तेव्हा 'के.ए.' च्या पाट्यांची जागा 'एम.एच.' च्या पाट्यांनी घेतलेली असते..
मग अंदाजे ७-८ च्या सुमारास बस एखाद्या टुमदार हॉटेलात शिरते आणि तिथे प्रवाशी आपापली झोप चहा, कॉफी, सिगारेट, इत्यादी मार्गाने उडवितात..
प्रवासास परत सुरूवात होताच अजून एखादा नवा हिंदी चित्रपट लावला जातो.. जो साधारण ११ च्या सुमारास संपतो.. मग जे उदारमतवादी बसवाले असतात, ते तिसरा चित्रपट लागोलाग सुरू करतात आणि बाकीचे 'आकाशवाणी' सुरू करतात..
ह्या सुमारास मग आमच्यासारखे 'पामर' प्रवाशी आपापली उर्वरित झोप शोधण्याचा प्रयत्न करू लागतात..

-
कोकणी फणस

छोटा डॉन's picture

6 Oct 2009 - 3:00 pm | छोटा डॉन

मस्त लिहले आहे मालक, आवडले.
आठवणी चाळवुन पाहिल्य तुमच्या लिखाणामुळे ...

------
के.स.आर.सी.टी.व्ही.आर.एल.छोटा डॉन शर्मा
कलसिपल्या, मॅजेस्टिक, बंगरुळु
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रभो's picture

6 Oct 2009 - 2:45 pm | प्रभो

हा लेख्/काथ्याकूट फक्त सिटीबस साठी आहे का सगळ्या प्रकारच्या बस साठी?????

-(बसलेला)प्रभो

JAGOMOHANPYARE's picture

6 Oct 2009 - 3:07 pm | JAGOMOHANPYARE

मुम्बईत असताना कान्जुर्मार्ग ते मरोळ गाव ३९८ ने जायचो.... मुद्दाम पवई तलाव बघायला मिळावा म्हणून.. आणि कान्जुरचे बस स्टॉप अगदी गावातल्यागत वाटते.. झाडाखाली ८-१० लोक उभारलेले... घाटकोपरवरुन जायला मला अज्याबात आवडायचे न्हाय...

नंतर मग कंपनी बदल्ल्यावर सी एस टी ते चर्च्गेट बस ३ रु. तिकिट ... लई भारी वाटायचे...

आता हितं... मालदिवमध्ये.... एकूण २०० बेटं हायेत मानसं ( कोन रं त्यो मनसे म्हनाला ?)रहात्यात अशी.. ( उरलेली १८०० बिन मानसान्ची..... )
तर त्यापैकी फक्त २ बेटावर बशी हायेत.... एक मालदीव एरपोर्टवर ... ही बस लई झ्याक........ आर्टिफिशियल बेट हुलुमाले पत्तुर जाते.... दोन्ही बाजूला २ फूट खोलीवर समुद्र आणि मधी चिचोळा रस्ता.. त्यावर बस जाते.... निस्ती बसच... बाकी कशाला जायची परवानगीच न्हाई..

दुसरी बस अद्दू म्हनुन बेट हाय तिथे हाय म्हने... म्या अजुन नाय गेलो.... ते बेट दक्षिण गोलार्धात हाय म्हनं .....
उरलेलं देशभर सगळं ट्याक्षीनं न्हायतर चालत चालत चालत फिरायचं........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मसक्कली's picture

6 Oct 2009 - 3:13 pm | मसक्कली

आहो मी सिटीबस च सन्गितल पण......... :P

आपन इथे आनुभव शेअर करु शकता.... :D

फक्त बस शी रीलेटेड्...आसाव..... B)

भडकमकर मास्तर's picture

6 Oct 2009 - 3:37 pm | भडकमकर मास्तर

दिवसभरची मरमर करून बसमध्ये खिडकी मिळवून दीड तास झोपण्यासारखं सुख नाही,...

(दोन वर्षे ४२ नंबरने प्रवास केलेला..)
मास्तर
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

फ्रॅक्चर बंड्या's picture

6 Oct 2009 - 3:41 pm | फ्रॅक्चर बंड्या

कात्रज -निगडी की कात्रज ते भोसरी बस ४२ नंबर आहे...
आठवतय की मला पण

फ्रॅक्चर बंड्या's picture

6 Oct 2009 - 3:39 pm | फ्रॅक्चर बंड्या

मी बारावीत असताना क्लास ला जायचो
कात्रज ते लक्ष्मीनगर तिकीट ५ रुपये आहे.

पण वाहक (conductor) आमच्याकडुन ५ रुपये घ्यायचा अन आम्हाला ३.५० चे तिकीट द्यायचा , अन १ रुपया परत द्यायचा.

आमचा १ रुचा फायदा अन त्याला ५० पैसे
त्यामुळेच बहुतेक तोट्यात गेली असावी :? :?

गणपा's picture

6 Oct 2009 - 4:13 pm | गणपा

प्रकाटाआ.

शालेय जीवनात बेस्ट हा दि बेस्ट पर्याय होता. ६ वी ते १० वी ३२२ कालिना ते हनुमान रोड (पार्ले) बसने प्रावास केला. कंडक्टर आणि ड्रायवर दोघे ओळखीचे झाले होते, क्व्चीत जर कंडक्टर आणि ड्रायवर ची शिफ्ट बदलुन बदली कंडक्टर आणि ड्रायवर आले तरी त्यांच्याशी ओळखी काढायचो. ड्रायवरच्या बाजुला इंजीन जवळ जो दांडा त्यावर बसुन प्रवास करयचो, मग भले बस रिकामी का असेना.
मग डिप्लोमाला असताना ३ वर्ष तीच ३२२ पण विरुद्ध दिशेने जाणारी कालिना ते विद्याविहार पकडायचो. अशी एकंदर ८ वर्ष सलग बेस्ट प्रवास केला.
एकदा गंमत झाली, टिकिटाचे पैसे रोज मिळत वर रुपया २ रुपये. शाळा सुटल्यवर भुक लागली म्हणुन टिकिटा पुरते ठेवुन वरचे पैसे संपवले. आणि चक्क बस मध्ये डोळा लागला.(त्यादिवशी नवीन ड्रायवर असल्यने मागे बसलो होतो.) .उठलो तो डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला. पाचावर धरण बसली, खिशात दमडी नाही, चालत जायच तर रस्ता माहीत नाही. रिक्षा करुन गेलो तर घरी समजेल आणि मार बसेल तो वेगळा. कंडक्टरला सगळ खर खर सांगीतल, बापड्याने चकटफु घरापर्यंत सोडल.
डिप्लोमा नंतर ऐरोलीला कॉलेज ल होतो. कुर्ला ते ठाणा बाय ट्रेन, आणि मग ठाणा ते ऐरोली सेक्टर ३ आसा ३ वर्ष एस्टी ने प्रवास घडला. अरारारारा काय तो प्रवास लै बेक्कार राव, गाडी कधी कुठे लागेल भरवसा नाही . गाडीचा नंबर अनाउंस केला जायचा, मग ही गर्दी उसळायची. हातातल्या ड्रॉईंग शिट्स , मिनी ड्राफ्टर सांभाळत कधी दारातुन तर काधी मागच्या इमर्जंसी खिडकीतुन घुसायचो.. पण त्यात पण मज्जायाय्ची. बरेच वेळा कंडक्टर बांधलेला असायचा ८-१० मित्रांच्या टोळक्यात ३-४ टिकीटच काढायचो :)

सोनम's picture

6 Oct 2009 - 4:23 pm | सोनम

आमचा बसचा प्रवास कधी तरीच होत असतो. :) त्यामूळे जास्त काही अनुभव नाही सांगता येणार. :(
काही दिवसापूर्वी (म्हणजे परवाच ;) ) बस मध्ये इतकी गर्दी होती की, बसायला जागा नव्हती. :( त्यामुळे सुमारे १.३० -२ तासाचा प्रवास उभे राहूनच करावा लागला. ~X(
एकदा तसेच एस.टी . ने प्रवास करताना बसमध्ये जागा नव्हती. :( फक्त एक जागा शिल्लक होती. ती जागा पाहून आनंद झाला :D , तिथे बसल्यावर कळले की ती जागा कंडक्टर ची जागा होती. #o मी ही मुद्दाम तिथेच बसून राहिले. :) बिचारा कंडक्टर रागाने माझ्याकडे पाहत होता. :( पण मी काही जागचे हालले नाही. :D शेवटी त्याला दुसरीकडे जागा भेटल्यावर तो तेथे बसला. :)

नाम्या झंगाट's picture

6 Oct 2009 - 5:06 pm | नाम्या झंगाट

याच्यावरून मला मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली.
कृपया जरुर वाचावे...
आमची पी.एम.टी.

http://uddhavraj.blogspot.com/2008/11/blog-post_9554.html

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे हा लेख तर या उद्धवराजने चोरलाय. आपल्या टार्झटाने त्याच्या कुबड्या खवीस अशा पूर्वजन्मात तो लिहीला होता. ही घ्या लिंक!

व्वा! या वाङमयचोर माणसाने नावपण काय घेतलं आहे, "उद्धवराज" ...आवडलं एकदम!!
शिवाय पर्‍याचाही एक लेख चोरलाय.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2009 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच की... या उध्दवराजने तर जबरीच चोरी केली आहे. तो कधी टार्‍याच्या तावडीत येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना.

नीलकांत / तात्या... मिपावर लेखन कॉपी पेस्ट करता येऊ नये अशी सोय करता येईल का? काही साइट्सवर अशी सोय आहे असे आठवते.

बिपिन कार्यकर्ते

सखाराम_गटणे™'s picture

6 Oct 2009 - 5:28 pm | सखाराम_गटणे™

चोराविरुध काहीत्री करा[

टारझन's picture

6 Oct 2009 - 5:57 pm | टारझन

अरेच्च्या ,,,

खरंच की ... बाकी काय लोकं आहेत =)) अगदी डिस्क्लेमर सहित लेख ढापतात :)
अंमळ मौज वाटली. असो .. आमचा लेख चोरण्यात आला ह्यात आम्हाला फारंच आनंद आहे. कारण लोकं दुनियादारी सुद्धा चोरून वाचतात (आमचे लेख स्वतःच्या नावावर खपवतात इतकंच !!
असो ... आणखी अवांतरपणा करत नाही , अन्यथा खाते उडायचे :)
उद्धवराज (वा उद्धव + राज !! क्या बात है !!! ) टेमकरांना अजुन लेखण चोरायचे असल्यास आमच्या ब्लॉगची दारे सताड उघडी आहेत. कोणी त्यांच्या ओळखीचे असले तर निरोप पोचवावा :)

असं लिहीणारंच होतो ... पण च्यामारी .. .त्याने बहुदा तो ब्लॉग आत्ताच ऊडवला !
तो इथे कोणत्या तरी फेक आय.डी. ने वावरत असावा :)

- (अंमळ फेमस) टारझन
छ्या .. कैच्याकैच !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन टेमकर अशी सही नाही टाकायची?? ;-)

(अवांतरेतर) अदिती

प्रभो's picture

6 Oct 2009 - 5:34 pm | प्रभो

तेच म्हटलं...अपल्या टारभारांच्या खव प्रस्तावनेतच त्यांनी ह्याची लिंक दिलेली आहे..

-प्रभो

धमाल मुलगा's picture

6 Oct 2009 - 5:43 pm | धमाल मुलगा

आयला,
दुसर्‍याचे लेख सरळसरळ ढापायचे आणी स्वतःच्या ब्लॉगवर टाकायचे? इतकी हौस कशाला असते बॉ लोकांना?
नाही स्वतःला काही लिहिता येत तर गप पडावं ना...असल्या चोर्‍यामार्‍या करुन काय मिळतं कोण जाणॅ!

बरं...उचललं तर निदान कोणाचा लेख आहे ह्याचीही टीप लिहिता येऊ नये? इतकी फुकटेगिरी???

लय भारी!!

ज्यांना ह्याबद्दल (अश्या चोर्‍यांबद्दल) खरोखरच काही वाटते त्या आपण सगळ्यांनी त्या पंटरच्या ब्लॉगवर जाऊन कमेंटींचा पाऊस पाडायचा का? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उद्धवराज टेमकर मिपा वाचक असणार! लगेच पाच मिनीटात पान गायब झालं आहे.

अदिती

नाम्या झंगाट's picture

6 Oct 2009 - 6:04 pm | नाम्या झंगाट

होय. मी मिपा वाचक आहे. आवडलेला लेख लिंक केल्याबद्द्ल आणि त्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून ही क्षमायाचना.....!!

बाकी बर्याच जनांनी चांस मारून घेतला.....!!!!

(दुखावलेला पण तरीही सर्व काळ मिपाप्रेमी राहणारा - नाम्या झंगाट)

अनामिक's picture

6 Oct 2009 - 6:11 pm | अनामिक

तुम्ही चोरी पकडून दिलीत, मग तुम्ही का दुखावताय? की तुम्हीच ते उद्धवराज टेमकर? फक्तं एक शंका म्हणून विचारतो आहे.

-अनामिक

आत्ताचं माझे आवडते लेख ब्लॉग वरुन काढून टाकले......

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

टारझन's picture

6 Oct 2009 - 7:32 pm | टारझन

आत्ताचं माझे आवडते लेख ब्लॉग वरुन काढून टाकले......

तुमचे हे शब्द वाचून उर भरून आला हो (आता ओसंडून वहातो आहे) !! कृपया मी आपली सर्व मिपाकरांतर्फे माफी मागतो , आपण आपल्या ब्लॉगवर टाकलेले लेख "केवळ आपल्याला आवडतात" म्हणून टाकले होते , तरीही मिपाकरांनी (तिथं तसं लिहीलेलं दिसलं नाही म्हणून काय झालं ?) आपल्यावर तोंडसुख घेतल्याबद्दल त्यांच्या तर्फे मी तुमची माफी मागतो.
बाकी नाम्या झंगाट जी, आपल्या प्रामाणिक पणा वर आम्ही बेहद खुष झालोत, तेंव्हा माझा उरलेला ब्लॉगपण तिकडे "केवळ आवडला" म्हणून लावावा, अशी मी जाहीर याचना करतो हो :) आणि आपल्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या भरगोस वाढो अशी आशा करतो ! त्याच बरोबर अवांतर प्रतिसाद लिहील्याबद्दल राजे,नाना बरोबर माझेही खाते उडु नये म्हणून तात्याची जाहीर माफि मागतो.

- (ब्लॉग वर केवळ आवडते (दुसर्‍यांनी लिहीलेले) लेख लावणारा ) झाम्या झुंगाट

धमाल मुलगा's picture

6 Oct 2009 - 6:14 pm | धमाल मुलगा

नाम्याभौ,
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही जाहीरपणे 'आपण हे केलं होतं 'असं सर्वांसमक्ष सांगितलं. माहिती नसेल तर अशा गोष्टी घडु शकतात, त्याबद्दल काहीच म्हणणे नसते कोणाचे...उदाहरणादाखल तुमचाच हा प्रकार घेऊ :)
पण बर्‍याचदा असं दिसतं की स्वतःच्या ब्लॉगवर इकडुन तिकडुन चोरुन लिहिलेलं असतं...आणी त्या लेखकाचं श्रेय स्वतः घेण्याचा विचारही असु शकतो...अश्या प्रवृत्तींविरोधात वरील प्रतिसाद होते. तेव्हा आपण गैर मानुन घेऊ नये.

छोट्या-छोट्या चुका कधीमधी सगळ्यांकडुनच होतात की :) फिकीर नॉट!
मोठ्या मनानं तुम्ही जाहीर केलं आणि ब्लॉगवरुन ते लेखन काढलंत ह्यातच सर्व काही आलं की!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धमुशी सहमत. फिकीर नॉट!

फक्त पुढच्या वेळेस आपले आवडते लेख ब्लॉगवर देताना योग्य माणसाला त्याचं श्रेय मिळेल हे पाहिलंत की झालं.

अदिती

निखिल देशपांडे's picture

6 Oct 2009 - 6:28 pm | निखिल देशपांडे

अदितीशी सहमत..
मला आवडलेला एक लेख मुळ लेखकाचे नाव किंवा लिंक दिले की झाले... जमल्यास त्याची परवानगी सुद्धा घ्यावी :-)

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Oct 2009 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll

वर प्रतिसाद दिलेल्या सर्व मित्र मैत्रिणींशी सहमत. :)

(जालीय सहमतीकार)
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 6:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ
(आज मी एकच विचार दोनदोनदा का करत आहे? चढलेली नसावी! )
अदिती

;) (चौकस)चतुरंग

नाम्या झंगाट's picture

6 Oct 2009 - 5:32 pm | नाम्या झंगाट

याच्यावरून मला मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली.
(त्यामुळे सांगीतले कि मिसळ्पाव वर असलेल्या एका मस्त लेखाची आठवण झाली. )

लेख आवड्ला म्हणून लिंक केला........कशासाठी?????

फ्क्त मिसळ्पाव आणी मराठी साठी....

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 5:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिंक दिल्याबद्दल धन्यवाद! चोरी सापडली ना! तुम्ही नका एवढे अपसेट होऊ!!

अदिती

निमीत्त मात्र's picture

6 Oct 2009 - 5:33 pm | निमीत्त मात्र

खरंच की सरळ सरळ ढापलाय! नावही हायब्रीड आहे उद्धव-राज!!
टारझनराव तुमच्या सोयीसाठी त्याने फोटू पण दिला आहे, एक विमा काढून या पटकन :)

पर्नल नेने मराठे's picture

6 Oct 2009 - 6:30 pm | पर्नल नेने मराठे

पृष्ठ आढळले नाही
क्षमस्व, आपण zzz zzz ब्लॉगवर शोधत असलेले पृष्ठ विद्यमान नाही.
8|
चुचु

धमाल मुलगा's picture

6 Oct 2009 - 6:44 pm | धमाल मुलगा

तुला नाऽऽय गं तडी.... तु खेल आं......

च्यामारी...वाच की जरा...उडवलं ते लिखाण त्यांनी स्वत:

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Oct 2009 - 10:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या एका डेअर डेव्हील मित्राचा अनुभवः
महाराज रात्री एस्.टीने कोल्हापूरहुन पुण्यास निघाले होते. नॉनस्टॉप होती. वाटेत ह्याने झोपलेल्या कंडक्टरला उठवून करंगळी दाखवली, पण कंडक्टर ऐकेना, म्हणाला बस आता नॉनस्टॉप पुण्यापर्यंत जाणार तेव्हा स्वारगेटलाच मोकळे व्हा! बराच वेळ हुज्जत घातली पण तो बस थांबवायला तयारच नव्हता. शेवटी माझा मित्र म्हणाला आता इथेच करीन..! कंडक्टरला वाटलं हा काय करणार..? "कर बेलाशक"!ह्या पठ्ठ्याने खरोखरंच खिडकीतून धार सोडून दिली.. तर मागच्या सिटवर झोपलेल्या (दुर्दैवी) लोकांनी "पाऊस आला पाऊस आला म्हणत गडबडीने खिडक्या बंद केल्या !!
कंडक्टरने साष्टांग नमस्कार घातला!!

चतुरंग's picture

6 Oct 2009 - 10:26 pm | चतुरंग

जबराटच अनुभव आहे!
एकदम 'धारदार रातराणी' झाली की!! ;)

चतुरंग (धारवाला)

अवलिया's picture

6 Oct 2009 - 10:20 pm | अवलिया

५० वा प्रतिसाद.. चालु द्या :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

इकडे मध्य प्रदेशातील बसचे अनुभव इथे वाचा.
http://www.misalpav.com/node/1542

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

मसक्कली's picture

9 Oct 2009 - 1:25 pm | मसक्कली

मुळ विषय तर गायबच केला तुमि ~X(

काय हे कोनाच काय कोनाच काय ?? :O